शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वळीवंडे येथे आरोग्य मंत्र्यांच्या घरासमोर १४ जानेवारीला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 00:42 IST

काँग्रेसचा इशारा : कावले कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे

देवगड : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सुरूवातीला आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात अनेक घोषणा केल्या पण त्यातील कोणतीही आश्वासने ते पूर्ण करू शकले नाहीत. याउलट पूर्वी होती त्यापेक्षा देवगडातील आरोग्य यंत्रणा अधिकच अधोगतीला गेली आहे, अशी टीका जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळ खडपे यांनी केली. तसेच स्थगित झालेले आंदोलन १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वळीवंडे येथील आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या घरासमोर होणार असल्याचे खडपे यांनी यावेळी सांगितले.सर्वसामान्य माणूस आज सरकारी आरोग्य यंत्रणेवर पूर्णपणे नाराज, नाखूश आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेतील कमरतेमुळे नाईलाजाने आता त्याला अधिक खर्चिक अशा खासगी आरोग्य यंत्रणेकडे वळावे लागत आहे. याचा फार मोठा मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास आज सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेक प्रसंगी प्रसुतीसाठीसुद्धा गोव्यापर्यंत धावावे लागल्याची उदाहरणे आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री या जिल्ह्यातील असूनही या समस्येवर इलाज करण्यात ते अयशस्वी झाले आहेत. देवगड ग्रामीण रूग्णालयात संदीप कावले यांना चुकीच्या उपचारामुळे जीव गमवावा लागला. त्या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्याची कारवाईही केली. पण त्यानंतर चौकशी समिती प्रमुख डॉ. सतीश पवार यांनी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने संबंधित डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला. मृत तरूण एक सर्वसामान्य रिक्षाचालक होता. त्याच्यावर सर्व कुटुंब अवलंबून होते. कावले यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. नुकसान भरपाई व मृताच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी सरकार देत नसेल तर काँग्रेसपक्ष त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे बाळ खडपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)