शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘देवाचा डोंगर’वर आटआट

By admin | Updated: January 19, 2015 00:23 IST

शासनाचे दुर्लक्ष : कच्चा रस्ता, महिलांची पायपीट चालूच

श्रीकांत चाळके - खेड तालुक्यातील तुळशी देवाचा डोंगर या गावातील धनगरवाडीचा पाण्याचा आधारच संपल्याने, येथील ग्रामस्थांना घरापासून ४ किलोमीटर अंतरावरील जामगे गावात जावे लागते. देवाच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या छोटयाशा पाण्याच्या डबक्यातील पाणी संपल्याने आतापासुनच ही पायपीट सुरू झाली आहे़ तुळशीपासून ४ किलोमिटर अंतरावरील ही वाडी़ रस्ता देखील कच्चा, तोही दगडधोंड्यातून जाणारा़ रामदास कदमांनीच हा रस्ता तयार केला. मात्र त्यानंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे कोणी ढुकुनही पाहिले नाही़ डोंगरदऱ्यामध्ये ही वाडी असल्याने शासनाचा पाण्याचा टँकर तेथे जात नसल्याने प्रशासनही हताश झाले आहे़खेड शहरापासून तुळशी देवाचा डोंगर हे २० किलोमिटर अंतरावर आहे़ या धनगरवाडीलगतच महादेवाचे मंदिर आहे़ याच गावामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात वसलेल्या अनेक वस्त्यापैकी धनगर समाजाची एक वाडी वसली आहे़ या वाडीत या समाजाची अवघी १० घरे आहेत़ येथील २५ ग्रामस्थांना येथे कायम स्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही़ या वाडीत लहानसा प-या आहे़ पाणी नोव्हेंबरपर्यंत पुरते़ त्यानंतर ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडतात. वाडी डोंगरावर असल्याने त्याना तुळशी गावात खाली उतरावे लागते. हे पाणी आणण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यात येतो. ज्यांच्याकडे वाहने नाहीत त्यांना डोंगरावरून जामगे गावात ४ किलोमीटरवर उतरावे लागत असल्याने पाणी घेऊन पुन्हा डोंगरावर चढणे अशक्यप्राय होत असल्याने दररोज एवढे अंतर चालत जावून पाण्यासाठी तीन तीन खेपा माराव्या लागत आहेत़ अशातच रस्ता खराब आणि बिकट असल्याने दोन दिवसाला पुरेल एवढे पाणी एकाच दिवशी भरावे लागत आहे़ आतापासुनच या धनगरवाडयांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे़ त्यांच्या गाई म्हैशींना पाणी पुरवण्याचे मोठे काम त्यांना करावे लागत आहे़ हे अवघड असले तरीही कसलीही तमा न बाळगता त्यांना हे करावे लागत आहे. धनगरवाड्यामध्ये असलेल्या या पाणी टंचाईला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात असून शासनाने यात लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पाण्याचा प्रश्न प्रलंबित खेड तालुक्यातील देवाचा डोंगर येथील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित.ाुळशी देवाचा डोंगरला कायमच पाण्याची प्रतिक्षा. ग्रामस्थांना करावी लागतेय ४ किलोमीटर पायपीट.पायथ्याशी असलेल्या छोट्याशा डबक्यातील पाणी संपले.डोंगरमाथ्यावर जाताना ग्रामस्थांना करावा लागतोय संघर्ष.कच्चा रस्ता, डांबरीकरण नाही, टँकर जात नसल्याने प्रशासनही हताश.नोव्हेंबरातच पाणी नाही.