शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मान्सूनची दमदार हजेरी

By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST

समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे

मालवण : मागील आठवड्यापासून खोळंबलेला मान्सून अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यात बरसायला सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभरातही सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला. समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने बंदर विभागाकडून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीबागायतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गेला आठवडाभर मान्सून हुलकावणी देत होता. शेतकरी आणि आंबा बागायतदारांनाही मशागतीची कामे करावयाची असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र शुक्रवारपासून मालवणात बऱ्यापैकी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत मागील २४ तासात तालुक्यात ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाच्या सरी दमदार असल्या तरी जोर नसल्यामुळे तालुक्यात कुठेही पडझडीच्या घटनेची नोंद नव्हती. दोन दिवसांत तालुक्याच्या सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे शेतीबागायतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी नांगरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. तर आंबा बागायतदारांनी बागायतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला असून समुद्रात ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी) दोडामार्गात संततधार! दोडामार्ग तालुक्याला शनिवारी मान्सून पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. या पावसाचा फटका साटेली-भेडशी आठवडा बाजाराला बसला. सामानाची आवराआवर करताना व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. अधूनमधून दर्शन देणाऱ्या वरुणराजाने शनिवारी सकाळपासूनच धो-धो बरसण्याचा धडाका लावला. तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. साटेली-भेडशी आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे मात्र बळीराजा सुखावला असून मशागतीची कामे सुरू झाली. ४८ तासात अतिवृष्टी? रविवार १४ जूनपासून ४८ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती निवारण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.