शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

जिल्ह्यात मान्सूनला सुरुवात

By admin | Updated: June 19, 2015 00:17 IST

महाबळेश्वरात २४ तासांत ४५ मि.मी. पाऊस

सातारा : मृग नक्षत्राला ११ दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचा साताऱ्यात पत्ता नव्हता. गुरुवारी अखेर मान्सूनच्या पावसाने साताऱ्यात हजेरी लावली. या पावसात चिंब भिजण्याचा आनंद सातारकरांनी लुटला. शहरात बुधवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पाऊस कोसळल्यानंतर गुरुवारीही ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाची संततधार सुरू झाली. पावसाच्या आगमनामुळे शहराच्या आजूबाजूला शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत. या पावसामुळे नागरिक सुखावले आहेत.शहरात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण होते. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर लगेचच जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे आगमन झाले. शहरात दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले होते. दुपारनंतर पावसाची संततधार सुरू झाली. या पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली. रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत होती.दरम्यान, कास परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणी पातळी वाढू लागली आहे. तलावात सात फुटांपर्यंत पाणी आहे. कास पठार परिसरात पडणाऱ्या पावसात भिजण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. महाबळेश्वर परिसरात या पावसामुळे पर्यटकांची संख्या रोडावली. (प्रतिनिधी)महाबळेश्वरात २४ तासांत ४५ मि.मी. पाऊसमहाराष्ट्राची चेरापुंजी संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात बुधवारपासून पावसाला प्रारंभ झाला. गेल्या २४ तासांमध्ये परिसरात ४५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली, तर गेल्या चार दिवसांमध्ये एकूण १७४.८ मि.मी. इतका पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली.