शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आचऱ्यात सोमवारी ‘गावपळण’ मेळावा

By admin | Updated: December 19, 2014 23:30 IST

कवी नानिवडेकर यांचे गावपळणीवर आधारित कवितावाचन, आचरा बिझनेस कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे चित्रफीत प्रदर्शन, स्थानिक आचरावासीयांचा गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार

आचरा : आचरा गावची दर तीन वर्षांनी होणारी गावपळण यावर्षी विविध कारणांनी चर्चेत राहिली. असे असताना गावपळणीच्या इतिहासात यावेळी प्रथमच येथील स्थानिक पत्रकारांच्या संकल्पनेतून छायाचित्र प्रदर्शन व गावपळण मिलन मेळाव्याचे आयोजन सोमवारी (दि. २२) दुपारी २.३० वाजता रामेश्वर संस्थानच्या भक्तनिवास सभागृहात केले आहे.‘क्षण आनंदाचे दिवस गावपळणीचे’ असे शीर्षक घेऊन येथील पत्रकारांनी इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, सरपंच मंगेश टेमकर, यशराज संघटना, आचरा बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज आदींच्या प्रमुख सहकार्यातून प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा विषय बनलेली आचरा गावची ऐतिहासिक गावपळण पुन्हा सुयोग्य पद्धतीने सर्वदूर पसरली जावी व त्यानिमित्त आचरावासीय एकत्र यावेत या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आचऱ्याचे सुपुत्र प्रख्यात साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गजानन नाईक, रामेश्वर देवस्थानचे सचिव संतोष मिराशी, वहिवाटदार सदाशिव मिराशी, सरपंच मंगेश टेमकर, आचरा पोलीस ठाण्याचे महेंद्र शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. १५० ते २०० छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. कवी नानिवडेकर यांचे गावपळणीवर आधारित कवितावाचन, आचरा बिझनेस कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे चित्रफीत प्रदर्शन, स्थानिक आचरावासीयांचा गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)