शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट गुरे, रस्ता भरे!

By admin | Updated: June 13, 2015 00:20 IST

कसई दोडामार्ग : वाहतूकधारक त्रस्त, भाजीपाला फस्त

वैभव साळकर - दोडामार्ग  -कसई दोडामार्गचे शहरवासी कचरा समस्या, वाहतूक कोंडीची समस्यांपासून हैराण झाले असताना त्यात आता मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा प्रश्न बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात सतावतो आहे. रस्त्यात तळ ठोेकणाऱ्या गुरांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अशा मोकाट गुरांना आळा घालण्याची मागणी शहरवासीयांकडून सातत्याने होत आहे. कसई दोडामार्ग शहराला नगर पंचायतीचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराचा कारभार हाकताना येथील जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे प्रशासनानेही जाणून घेणे गरजेचे आहे. शहरवासीयांना कचरा समस्या, वाहतूककोंडीचा प्रश्न आ वासून उभा आहेच. याचबरोबर रस्त्यावरील मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा सर्वात जास्त त्रास शहरातील व्यावसायिक, भाजी विक्रेते, फुलविक्रेते आणि वाहनचालकांना होत आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या दुकानात गुरांचे झुंडीच्या झुंडी शिरण्याचा प्रकार बाजारपेठेत वारंवार पाहवयास मिळतो आहे. फुलविके्र त्यांच्याबाबतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या मोकाट गुरांचा त्रास भाजी व फुलविक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. जर एखाद्या गुरास मोठ्या गाडीची ठोकर बसून ते मृत्यूमुखी पडल्यास अथवा जखमी झाल्यास त्याचा मालक भरपाईसाठी दत्त म्हणून उभा राहण्याचे प्रकारदेखील अनेकदा मार्केटमधील नागरिकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे आपल्या जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवरच खरे तर कारवाई करण्याची गरज आता भासत आहे. (उद्याच्या अंकात वाचा - बाजारपेठ विस्तृतीकरणाचे राहणार मोठे आव्हान?)दुकानाचे नुकसानअनेकवेळा दोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमध्येच झुंजी लागतात. एकदा बिथरलेले हे बैल किंवा जनावरे मग काही केल्या मागे न हटता भर रस्त्यात अथवा शेजारच्या दुकानात बैल घुसून नुकसान करतात.मकोंडवाड्याची गरजशहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून एका विशिष्ट ठिकाणी बांधण्यासाठी कोंडवाड्याची गरज आहे. मात्र, दोडामार्ग शहरात कोंडवाडा नसल्याने जनावरांना पकडून मग त्यांचे करायचे काय? असा प्रश्न प्रशासनाला पडतो आहे. परिणामत: भविष्यातील विचार करता, शहरामध्ये कोंडवाड्याची गरज ही एक मोठी जबाबदारी नगरपंचायतीकडे असणार आहे.भर बाजारपेठेतच झुंजीचे प्रकारदोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणारे बैल भर बाजारपेठेतच झुंजण्याचे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.