शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारसाठी मोबाईल व्हॅनची फेरी

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

पाणी नियोजनाची दिली जातेय माहिती-माजगाव, मळगाव, नेमळेत उत्साही स्वागत

तळवडे : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रचार व जनजागृतीसाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे मोबाईल व्हॅनद्वारे फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रारंभ माजगाव, मळगाव, नेमळे या गावांतून करण्यात आला. सध्या दुष्काळाचे चटके महाराष्ट्राला बसत असताना शासनामार्फत विविध योजना व प्रकल्पांतून पाणी नियोजन व पाण्याच्या बचतीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलशिवार योजनेचा प्रारंभ करून महाराष्ट्रभर त्याची काटेकोर अमंलबजावणी करण्यात आली. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या योजनेद्वारे पाण्याचे नियोजन व नियोजनासाठी राबविण्यात येणारे उपचार मातीनाला बांध, सिमेंट नालाबांध, वळण बंधारे, समतोल चर, गाळ काढणे, मजगी व लघू पाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेकडून बांधण्यात येणारे सिमेंट नालाबांध याविषयी प्रबोधन केले जात आहे. शेतकरी वर्गाने या योजना यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. कोणतीही योजना यशस्वी करायची असल्यास ग्रामस्थ व शेतकरी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभते. त्यामुुळे शेतकऱ्यांनी याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे मळगावचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, कृषी सहायक सी. जी. मेस्त्री, कृषी पर्यवेक्षक सी. जी. मेस्त्री, कृषी पर्यवेक्षक आर. एल. घावरे, विजय राऊळ तसेच मळगावचे ग्रामस्थ व शेतकरी वर्ग व अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचाआज बदलत्या हवामानानुसार व निसर्गातील बदलामुळे भूमीवरील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभाग, लघू पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जलसंपदा विभागामार्फत ही कारवाई केली जाते. त्यामुळे या योजनेचा योग्य अवलंब झाला आहे. पावसाचा थेंबन्थेंब जमिनीत मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविली जात आहे. यात शेतकरी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.