शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना मनसे हाच पर्याय : उपरकर

By admin | Updated: July 18, 2014 23:14 IST

सत्ता आणि पद डोळ्यासमोर ठेवून

कणकवली : पालकमंत्री नारायण राणे यांचे कॉँग्रेसमधील राजीनामा नाट्य असो की आमदार दीपक केसरकर यांचा शिवसेनाप्रवेश हे दोन्ही बदल सत्ता आणि पद डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असल्याची टीका करतानाच सर्वांना मनसे हाच योग्य पर्याय असल्याचे प्रतिपादन मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी केली आहे. येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख चेतन कदम उपस्थित होते. उपरकर म्हणाले की, सध्या जिल्ह्यात सर्वच पक्षांत इकडून तिकडे धावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तरीही राजकीय नेत्यांना मनसे हा एकमेव पर्याय आहे. कोकण विकासासाठी मनसे हाच पर्याय राहणार असून ‘राजकीय भूकंप’ सत्ता व पदासाठी होत आहेत. सत्तेतील आमदार केसरकर आपल्या मंत्र्यांकडून काम करून न घेता कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाणार असल्यानेच दहशतवादाची ओरड करून धावाधाव करत आहेत. अर्थ, पाटबंधारे, ग्रामविकास आदी महत्त्वाची खाती आमदार केसरकर यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडेच होती. विरोधी बाकावर असतानाही आम्ही जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. मात्र, आमदार केसरकर यांच्याकडून विकासकामात अडथळे आणले जात हंोते. तिलारी धरणप्रश्नी वनटाईम सेटलमेंटचे आंदोलन शरद पवार आणि आमदार केसरकर यांनी दोनदा मागे घ्यायला लावले. ग्रामसभा न घेणे, ग्रामस्थांकडून अधिकार हिरावून घेणे हे प्रकार होत होते. सर्व प्रयत्न करूनही राष्ट्रवादीकडून केसरकर यांना लालबत्ती मिळाली नाही. शिवसेनेने मधाचे बोट लावून पक्षप्रवेश करत असलेल्या केसरकर यांचा ‘राणेंचा दहशतवाद’ हा विचार नौटंकी असल्याची टीका, उपकरकर यांनी केली. दहशतवादाच्या व्यासपीठावर कर्नल सुधीर सावंत, संदेश पारकर, पुष्पसेन सावंत एकत्र होते. तेव्हा आम्ही नारायण राणेंसोबत असताना केसरकर राणेंच्या केबिनबाहेर असायचे त्यावेळपासून आतापर्यंत दहशतीची स्थिती बदललेली नाही, हे केसरकर यांनी लक्षात घ्यावे. नारायण राणेंची राजकीय भूकंपाची भाषा म्हणजे भविष्यातील सत्ताबदलाची बेगमी आतापासून केली जात आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी नारायण राणे मनसेत चालतील मात्र त्यांची मुले नाही, असे सांगितले होते. राणेंना मनसेत प्रवेश दिल्यास राज यांचा आदेश पाळू, अशी उपरकर यांनी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)