शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: April 4, 2015 00:07 IST

न्याय देण्याची मागणी : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणांच्या पोलिसांच्या तपास पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदच्या दिलेल्या हाकेला शुक्रवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील पटकीदेवी मंदिरापासून बाजारपेठमार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना निवेदन देऊन आपल्याला न्याय देण्याची मागणी केली.कणकवली शहर व परिसरात गेल्या वर्षभरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी शहरातील तीन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान घरफोडी प्रकरणातील सोने विकत घेतलेल्या सुवर्णकाराचे नाव समोर आले होते. या सुवर्णकारासह अन्य सुवर्णकारांवर पोलीस दडपशाहीने कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला होता. सुवर्णकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. त्यामुळे गुरुवारी व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आपले म्हणणे मांडले होते. तसेच पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करीत कणकवली बाजारपेठ ‘बंद’ची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद होती, तर तुरळक प्रमाणात काही दुकाने उघडी होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील पटकीदेवी मंदिराकडून उपविभागीय पोलीस कार्यालयापर्यंत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यामध्ये सुवर्णकारांसह काही नागरिकही सहभागी झाले होते. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, माजी आमदार राजन तेली यांच्यासह काही राजकीय नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांना दैवज्ञ हितवर्धक समाज संघटना कणकवली, कणकवली तालुका व्यापारी महासंघ तसेच धनंजय कसवणकर यांच्यापत्नी शिवानी कसवणकर यांनी निवेदन सादर केले. तसेच आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली. (वार्ताहर)तपासात पक्षपातीपणा नाहीघरफोडीप्रकरणी पोलिसांचा कायदेशीररीत्या तपास सुरू आहे. आमच्या तपासावर वरिष्ठ अधिकारी तसेच न्यायालयाचा अंकुश असतो. आम्ही सर्वेसर्वा नाही. त्यामुळे तपास करताना पक्षपातीपणा होणार नाही, तसेच आरोपी सोडून कोणावरही विनाकारण कारवाई होणार नाही, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले....तर तीव्र आंदोलनकणकवली बाजारपेठ बंद ठेवून तसेच मोर्चा काढून पोलिसांकडे न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे. मात्र, पोलिसांची दडपशाही अशीच सुरू राहिल्यास तसेच न्याय न मिळाल्यास जिल्ह्यातील सुवर्णकार, व्यापाऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी शुक्रवारी हॉटेल साईपॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.