शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सीमकार्डचा गैरवापर; दोघांवर गुन्हा

By admin | Updated: July 31, 2016 00:29 IST

शिरगाव येथील प्रकार : दहशतवादविरोधी पथकाची सिंधुदुर्गातील पहिलीच कारवाई

देवगड, सिंधुदुर्गनगरी : शिरगाव येथील मोबाईल विक्रेता नरेश सुभाष चव्हाण व युसन चंद्रमान तमांग यांनी सीमकार्डधारकाची संमती नसताना सीमकार्डचा गैरवापर करून दिशाभूल केल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. देवगड न्यायालयासमोर शनिवारी हजर केले असता दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दहशतवाद विरोधी पथकामार्फत दहशतवादी कारवाईच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यावेळी फोन संभाषण तपासणी मोहीम राबविली असताना शिरगाव येथील मोबाईल विक्रेत्याने नेपाळी युवकाला दिलेल्या सीमकार्डवरून नेपाळमध्ये सतत आठ महिने वारंवार कॉल झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे दशतवादी पथक व देवगड पोलिस यांनी संयुक्त कारवाई मोहीम राबवून दोघांना अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड आगारात वाहक पदावर कार्यरत असणारे दत्ताराम यशवंत खांदारे (रा. शिरगाव) यांनी आठ महिन्यांपूर्वी शिरगाव येथीलच नरेश सुभाष चव्हाण यांच्या दिनेश मोबाईल शॉपीमधून ७२६४९२००१५ या नंबरचे सीमकार्ड विकत घेतले होते. हे सीमकार्ड चालू होत नसल्यामुळे खांदारे यांनी ते पुन्हा मोबाईल शॉपी विक्रेते चव्हाण यांना परत दिले व सुरू करून देण्यास सांगितले. मात्र, चव्हाण यांनी खांदारे यांच्या नावावरती नोंदणी झालेले सीमकार्ड परस्पर युसन चंद्रमान तमांग यांना दिले. तमांग या सीमकार्डवरून आपल्या गावी नेपाळ येथे नातेवाइकांशी वारंवार आठ महिने संपर्क साधायचे. या सीमकार्डचा गैरवापर केल्याप्रकरणी नरेश चव्हाण व युसन तमांग यांच्याविरुद्ध देवगड पोलिस ठाण्यात मूळ सीमकार्ड मालक खांदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सीमकार्डधारकाची संमती नसताना सीमकार्डचा अपहार करून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास देवगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.(प्रतिनिधी) सीमकार्डधारकांची पडताळणी सुरू जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाच्यावतीने जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सीमकार्डधारकांची पडताळणी सुरू आहे. सीमकार्ड कोणाच्या नावे आहे, त्याचा वापर कोण करतो, सीमकार्ड घेताना ग्राहकाने दिलेली माहिती सत्य आहे का? खोट्या माहितीच्या आधारे सीमकार्ड घेतले आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे. देशासह जगभरात दहशतवादी संघटनांच्या वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांना पोलिस अधीक्षकांचे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांनी सीमकार्ड खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. आपले सीमकार्ड दुसऱ्याला वापरायला देऊ नये. आपल्या सीमकार्डचा बेकायदेशीर कृत्यासाठी वापर होऊ शकतो. त्यामुळे सीमकार्ड विक्रेते व वितरकांनी ग्राहकांच्या कागदपत्रांची खातरजमा करूनच सीमकार्डची विक्री करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी केले आहे.