शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आरोंदा जेटीबाबत तेलींकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: January 23, 2015 23:35 IST

परशुराम उपरकर : आरोंदा तिठा ते किरणपाणी रस्त्यावरील बांधकाम नियमबाह्य

कणकवली : आरोंदा जेटी प्रकल्पावरून राजन तेली जनतेची दिशाभूल करीत आहेत. आरोंदा तिठा ते किरणपाणी रस्त्यावरील बांधकाम नियमबाह्य असून, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी मेरिटाईम बोर्डाला पत्र लिहिले आहे. त्यामुळे आरोंदा जेटी बांधकामात अनियमितता असल्याची टीका मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी केली. येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, आरोंदा जेटीबाबत परवानग्या न घेता काम सुरू केल्यामुळेच आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेटीबाबतच्या कामात अनियमितता तसेच पर्यावरणविषयक धोका हे दोन प्रमुख मुद्दे याचिकेतून मांडले आहेत. या प्रकल्पाजवळ खारलँड विभागाने बंधारा बांधला आहे. या ठिकाणची परवानगी घेणे आवश्यक असताना तसे झालेले नाही. तेली यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पांसाठी ग्रामसभेच्या ठरावाची गरज नसेल, तर ते नारायण राणे यांचे सहकारी म्हणून कार्यरत असताना जिल्ह्यात अनेक प्रकल्प झाले असते. कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत ग्रामसभेच्या ठरावाला बगल देऊन जनसुनावणी वेळी खाणमालकांच्या बाजूने तेली यांनी भूमिका घेतली होती. जे काँग्रेसमध्ये असताना केले तेच भाजपात येऊन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जेटीमुळे कितीजणांना रोजगार मिळाला? हे तेली यांनी जाहीर करावे. त्यामुळे आरोंदा जेटीबाबतचा त्यांचा दावा फोल आहे. कळणे मायनिंगसाठी ज्यांनी डंपर घेतले ते आता पस्तावले आहेत. तेली जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना कर्ज घेऊन ३०० डंपर घेतलेले आता किती समाधानी आहेत? याचे संशोधन त्यांनी करावे. कोणत्या कारखान्याने अथवा कंपनीने जिल्ह्यात यावे, हे त्या कंपनीने ठरवायचे आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल तेली यांनी करू नये. इन्सुली सूतगिरण, तेलताड प्रकल्प, करूळ काच कारखाना, कुडाळ एमआयडीसी याबाबतही त्यांनी विचार करावा व जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असा टोलाही उपरकर यांनी यावेळी लगावला. (वार्ताहर)अभिनंदनाचा ठराव ग्रामसभेत नामंजूरआरोंदा ग्रामसभेने तीनवेळा बहुमताने जेटीबाबत विरोधी ठराव घेतला आहे. सरपंचांनी तत्कालीन मंत्री नारायण राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव जेटी मालकांच्या सांगण्यावरून केला होता. मात्र, तो ग्रामसभेने नामंजूर केला. युती शासनाला विकासकामांसाठी ग्रामसभेच्या ठरावाची यापुढे गरज भासणार नसेल तर जनतेला नको असलेले प्रकल्प शासन जनतेच्या माथी मारायला निघाले आहे, असेच यातून सिद्ध होते.