शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

बेपत्ता संदीप मांजरेकर प्रकरणाचे गूढ उकलले

By admin | Updated: September 20, 2016 23:46 IST

तिघांना अटक : चित्रफिती पाहून कारवाई; पोलिसांची माहिती

कुडाळ : माजी ग्रामपंचायत सदस्य व शिवसेनेचे कार्यकर्ते संदीप मांजरेकर यांच्या बेपत्ता प्रकरणाला मंगळवारी नाट्यमयरीत्या वेगळेच वळण लागले आहे. संदीप मांजरेकर यांचे अपहरण केल्याप्रकरणी शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांसह त्यांच्या जवळच्या तीन सहकाऱ्यांना कुडाळ पोलिसांनी अटक केली. तसेच बेपत्ता संदीप यांनाही ताब्यात घेतले. संदीप यांना गोव्यात ठेवले होते, असा संशय कुडाळ पोलिसांनी व्यक्त केला असून, अटक केलेले संशयित आरोपी हे संदीप यांच्या बेपत्ता कालावधीत त्याच्या संपर्कात होते. याबाबतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.संदीप मांजरेकर हे १६ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. याची माहिती पत्नी सुप्रिया मांजरेकर हिने कुडाळ पोलिसांत दिली होती. तसेच बेपत्ता होण्याआधी येथील काही काँग्रेसच्या युवकांनी वाद निर्माण केला होता. त्यामुळे संदीप बेपत्ताप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांची नावे कुडाळ पोलिसांत सुप्रिया मांजरेकर यांनी दिली होती. त्यामुळे गेले चार दिवस हे प्रकरण गाजत होते.या प्रकरणावरून कुडाळचे राजकारणही तंग झाले होते. कुडाळ पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात दबावतंत्र आले होते. संदीपच्या बेपत्ता प्रकरणाला राजकीय वळण लागल्याने याप्रकरणी मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी संदीपच्या घरातील तसेच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचे जबाब घेतले होते. अखेर कुडाळ पोलिसांनी संदीपचे अपहरण करणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल केले.संदीपचे अपहरण केल्याप्रकरणी कुडाळचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी दिलेल्या तक्रारीनुुसार उदय रामचंद्र मांजरेकर (वय ३२), संदीप गुरुनाथ कुंभार (दोघे राहणार मधली कुंभारआळी), संदीप कुंभार, समीर सावंत (राहणार थिवी, गोवा) या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी संदीप कुंभारला अटक करण्यात आली नसून, या तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.संदीप बेपत्ताप्रकरणी त्याच्या पत्नीने काँगे्रस कार्यकर्त्यांची नावे कुडाळ पोलिसांत देत तक्रार केली होती. मात्र, मंगळवारी याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांसोबत अन्य चारजणांविरोधात गुन्हे दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले आहे. या दरम्यान मंगळवारी दुपारी संदीपला कुंभारवाडी येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले व कुडाळ पोलिस ठाण्यात आणले. यावेळी पोलिस ठाण्याच्या परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले चार दिवस गाजत असलेले हे प्रकरण नेमके का करण्यात आले, याचा उलगडा आता कुडाळ पोलिस अटक केलेल्या संशयित आरोपी तसेच संदीपकडून करून घेणार आहेत. (प्रतिनिधी)कुडाळ पेटले आहे, तू बाहेरच राहाकुडाळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार उदय मांजरेकर यांनी संदीप याच्याशी सपंर्क साधत याप्रकरणी कुडाळ पेटले आहे, तोपर्यंत तू बाहेरच राहा. या रेकॉर्डिंगच्या आधारावरच कुडाळ पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले. याप्रकरणी काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचे उदय याच्याकडे केलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कट कोणाचा? संदीपचे अपहरण केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी चार संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणामागचा नेमका कट कोणाचा? यामागचा उद्देश काय? याचा तपास कु डाळ पोलिस करणार आहेत.कुडाळ पोलिस ठाण्यात संदीपला आणल्यानंतर त्याठिकाणी त्याची पत्नी सुप्रिया मांजरेकरही उपस्थित होती. यावेळी सुप्रियाला चक्कर आली.पोलिसांना चांगले यश : अमोघ गावकरजिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर म्हणाले, संदीप मांजरेकर बेपत्ता प्रकरणाच्या तपासात पोलिस विभागाला चांगले यश मिळाले आहे. संदीप मांजरेकर यांचा चुलतभाऊ उदय मांजरेकर, सुनील पालांडे आणि संदीप कुंभार यांनी कट करून संदीप याचे अपहरण केले असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. या तिघांनीही संदीप याला सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील सुभाष पेडणेकर यांच्या घरी ठेवले होते. त्यानंतर तेथून त्याला थिवीम, गोवा येथे नेण्यात आले. त्यानंतर गोवा थिवीम येथे राहण्यास असलेला मूळ कुडाळ येथील समीर सावंत याच्याकडे संदीप मांजरेकर पोहोचला होता. त्यानंतर समीर सावंत याने पणजी येथे असलेल्या आपल्या मित्रांच्या खोलीवर नेऊन सोडले. त्यानंतर गेले दोन दिवस तो तिथूनही बेपत्ता झाला होता. मात्र, या प्रकरणातील सर्वांचाच पोलिसांनी माग काढीत त्यांना ताब्यात घेतले.20092016-‘ंल्ल‘-03रेकॉर्डिंग मिळाल्याने पोलखोलसंदीप मांजरेकर यांच्या बेपत्ता कालावधीत अटक केलेले संशयित संपर्कात होते. त्यांच्या संभाषणांचे रेकॉर्डिंग कुडाळ पोलिसांना मिळाल्याने या प्रकरणाचा पोलखोल कुडाळ पोलिसांना करता आला.