शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्याबाबत जनतेची पालिकेकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:02 IST

मोंडकर यांचा आरोप : भाजपकडून जनतेला न्याय देऊ

मालवण : मालवण शहर विकास आराखड्याबाबत पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मुळात आराखडा रद्दचा ठराव हा पालिका नियमावलीच्या बाहेर घेण्यात आला. त्यानंतर या आराखड्याला मुदतवाढ अपेक्षित असताना आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जनतेतून होणारी नाराजी लक्षात घेता आराखड्याला पालिकेने मुदतवाढ नाकारली आहे, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केला. दरम्यान, भाजप मालवण शहरवासीयांसोबतच असून आगामी पालिका निवडणूकही भाजपची असेल. त्यामुळे जनतेला अपेक्षित आराखडा साकारला जाईल, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला. येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजू आंबेरकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, महेश मांजरेकर, दादा वाघ, पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर आदी उपस्थित होते. आराखड्याबाबत जे रचनाकार मुदतवाढ मागत आहेत त्यांची नियुक्ती पालिकेनेच केली आहे. त्यामुळे आराखड्याबाबत अपयशी ठरलेली पालिका सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)शिष्यवृत्तीबाबत आठ दिवसांत निर्णयमालवण तालुक्यात चौथीच्या काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती चार वर्षे रखडली आहे. याबाबत वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध होताच भाजपच्यावतीने तालुकास्तरावर पाठपुरावा करून जिल्हा शिक्षण विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना प्रशासनस्तरावर रखडली असल्यास तसेच याला कोणी अधिकारी वर्ग जबाबदार असल्यास त्याची थेट तक्रार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली जाणार आहे.तसेच आठ दिवसांत हा प्रश्न न सुटल्यास शिक्षणमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी भूमिका मोंडकर यांनी मांडली.आगामी पालिका निवडणूक भाजपच जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत त्यानंतर जनतेला अपेक्षित आराखडा साकारला जाईल, अशी ग्वाहीही मोंडकर यांनी यावेळी दिली.