शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

आयत्या निधीवर मंत्र्यांचा डल्ला

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

भास्कर जाधव : गुहागरातील कार्यक्रमात तीन मंत्र्यांना खोचक टोला

गुहागर : आज तीन मंत्री जिल्ह््याला लाभले आहेत. त्यांनी जिल्हा नियोजनमधील आयत्या निधीवर डल्ला मारण्याऐवजी केंद्र व राज्याच्या तिजोरीतून जादा विकासनिधी आणावा, असा खोचक टोला आमदार भास्कर जाधव यांनी लगावला.गुहागर नगरपंचायतीच्या माध्यमातून वरचापाट मोहल्ला येथे तीन लाख लीटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली. भास्कर जाधव म्हणाले की, मंत्रीपद असताना कोट्यवधींचा अधिकचा निधी मी आणला. पालकमंत्री असताना अन्य पक्षातील सदस्यांनाही निधी दिला. मात्र, आज शिवसेनेव्यतिरिक्त कुठल्याही पक्षाला निधी मिळत नाही. जिथे निधी दिला जातो, तोही योग्य खर्ची पडत नाही. कारण कुडली येथे नियमात बसत नसतानाही जिल्हा नियोजनमधील २५ लाखांचा निधी २५ घरांसाठी दिला गेला. नगरपंचायतीची पाच वर्ष पूर्ण होण्याआधी शहरात २४ तास पाणी देण्याचे आश्वासन पूर्णकरणार आहे. यासाठीचा प्राथमिक टप्पा म्हणून नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. शुद्ध पाणी देण्यासाठी ट्रिटमेंट प्लांट बसविण्याचे कंत्राट पुणे येथील नामांकित कंपनीला दिले जाणार आहे. डीपी प्लान, पूर्णवेळ इंजिनिअर नसल्याने विकासकामात अडचणी येत असल्याचे त्यांनी मान्य केले.मोहल्ला येथील मदरशाचे बांधकाम कारण नसताना तोडण्याचे काम जाणीवपूर्वक केले गेल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी केला. हे काम कायद्यामध्ये बसवून करायचे प्रयत्न सुरू असण्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, उपसभापती सुनील जाधव, राजेश बेंडल, दीपक कनगुटकर, नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, गीता खरे, ना. ह. खरे, सुजाता बागकर, राकेश साखरकर उपस्थित होते.ग्रामपंचायत काळापासून नळपाणी योजनेसाठी विशेष योगदान देणाऱ्या तत्कालीन सभापती सदानंद आरेकर व माजी आमदार रामचंद्र बेंडल यांचा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, सुरेश देवकर, सुभाष साखरकर, बाळा तवसाळकर यांच्या कुटुंबियांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.यावेळी माजी उपसभापती सुरेश सावंत, उपनगराध्यक्ष जयदेव मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश शिर्के, युवक तालुकाध्यक्ष मंगेश कदम, शहराध्यक्ष संतोष वरंडे, मोहन बागकर, मनसे तालुकाध्यक्ष राजेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)नगरसेवक गैरहजर : फायदा तुम्हालाचराष्ट्रवादीची एकमुखी सत्ता असल्याने भाजप-सेनेकडून एकही नगरसेवक या कार्यक़्रमाला उपस्थित नव्हता. मात्र, मनसे तालुकाध्यक्ष राजेश शेटे तसेच सेना युवाध्यक्ष राकेश साखरकर उपस्थित होते. साखरकर यांनी आपण भास्कर जाधव यांचे फॅन असल्याचे सांगताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचा खांदेपालट झाल्यापासून पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरु आहेत. याबाबत भास्कर जाधव यांनी जयदेव मोरे नगराध्यक्ष असताना चांगले काम केले., आत्ताचे नगराध्यक्ष एकाच वॉर्डातील असल्याने त्याचा फायदा होईल, असे जाधव म्हणाले.नेत्यांवर तोंडसुखभास्कर जाधव यांनी कार्यक्रमादरम्यान सेना - भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. त्यांच्या चौफेर भाषणामुळे कार्यक्रमात रंगत आली.