शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मायनिंग प्रकल्पांना थारा नाही

By admin | Updated: November 27, 2015 00:06 IST

प्रवीण देसाई : कंपन्यांची खनिज उत्खननासाठी उत्सुकता

बांदा : डेगवे गावात विपुल वनसंपदा व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहेत. तसेच गावात लागवडीखालील क्षेत्र हे मोठे असून गाव नैसर्गिक साधनसुविधेने संपन्न आहे. यामुळे गावात पर्यावरणाला धोका पोहोचविणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना अथवा मायनिंग प्रकल्पांना थारा देणार नसून त्याला पूर्णपणे विरोधाची भूमिका ठेवणार असल्याचे डेगवे उपसरपंच मधुकर देसाई व डेगवे सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई यांनी डेगवे येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.राज्य शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचलनालयाकडून डेगवे गावात लोहखनिज उत्खननासाठी ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. गावातील लोहखनिज उत्खननासाठी निविदा मागविण्यात आली असून यासाठी कित्येक कंपन्यांनी खनिज उत्खननासाठी उत्सुकता दर्शविली आहे. डेगवे गावातील मालकी हक्काच्या जमिनी मायनिंग लिजखाली घेतल्यास याला प्रखरपणे विरोध करण्यात येईल. डेगवे गाव हा शेती बागायतींनी समृद्ध आहे. या गावाला शासनाने आदर्श ग्राम, कृषिपंढरी गाव व निर्मल ग्राम म्हणून पुरस्कार दिले आहेत. या गावात काजूचे सर्वाधिक उत्पन्न घेण्यात येते. येथील शेतकरी पूर्णपणे शेती बागायतींवर अवलंबून आहे.डेगवे गावातील परिसरात समृद्ध वनसंपदा असून जंगली प्राणी देखिल बहुसंख्येने आढळतात. अशा स्थितीत गावात लोहखनिजपट्ट्यांना मंजुरी देऊन शासनाने गावातील जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. याला गावातून ठामपणे विरोध करण्यात येईल. प्रसंगी याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डेगवे सरपंच स्वप्नाली आंबेरकर, आबा देसाई, काका देसाई, राजन देसाई, गुणा वराडकर, रावजी देसाई, अमित देसाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शासनावर नाराजीमात्र, याबाबत डेगवे ग्रामपंचायतीला कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नसून डेगवे गावातील जनतेला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याने मधुकर देसाई व प्रवीण देसाई यांनी शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.