शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक भरती संपली, शहर स्वच्छता मोहीम कधी?

By admin | Updated: February 20, 2015 23:11 IST

रत्नागिरी नगर परिषद : मारुती मंदिर परिसरात अजूनही घाणीचे साम्राज्य

रत्नागिरी : शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गेल्या आठवड्यात झालेल्या सैनिक भरती प्रक्रियेतील त्रुटी उघड झाल्यानंतर आता मारुती मंदिर परिसर स्वच्छतेची समस्या समोर आली आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छतेसाठी रत्नागिरी नगरपरिषद आता स्वच्छता मोहीम कधी हाती घेणार, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. रत्नागिरीत ८ ते १८ फेबु्रवारी २०१५ या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच गोवा, गुजरात व उर्वरित महाराष्ट्रासाठी सैनिक भरतीचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच या भरती आयोजनात अनंत अडचणी, त्रुटी उघड झाल्या. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांना अनेक गैरसोर्इंना सामोरे जावे लागले. केवळ ८ स्वच्छतागृहांमुळे तर दररोज येणाऱ्या हजारोे तरुणांची प्रचंड गैरसोय झाली. निवासाची सोय नव्हती की भोजन, नाश्त्याची व्यवस्था शासकीय पातळीवर करण्यात आली नाही. हॉटेल व्यावसायिकांना विश्वासात घेऊन किती तरुण या भरतीत सहभागी होणार, याची साधी कल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर जेवण नाहीच पण साधा वडापावही या तरुणांना उपलब्ध झाला नाही. त्यानंतरच्या दिवसात काही स्वयंसेवी संस्थांनी मोफत भोजन, नाश्त्याची व्यवस्था केली. निवास व्यवस्था नसल्याने वर्तमानपत्राचा कागद मारुती मंदिर सर्कल, परिसरातील मोकळी जागा, हिंदू कॉलनीतील काही लोकांच्या कुंपणात जमिनीवर टाकून झोपण्याची वेळ या तरुणांवर आली. स्वच्छतागृहेदेखील उपलब्ध नसल्याने आजूबाजूच्या परिसराचाच वापर स्वच्छतागृहांसारखा झाला आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांच्या महासैन्यभरतीच्या काळात या परिसराला अत्यंत बकाल स्वरुप आले आहे. त्याच्या खुणा मारूती मंदिर, हिंदू कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरात आजही दिसून येत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने या सर्व भागांमध्ये लवकरात लवकर खास स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी आता शहरवासियांतून होत आहे. अशाप्रकारचे मोठे कार्यक्रम घेताना त्याचे योग्य नियोजन नसेल, तर शहर परिसरातील क्रीडांगणे अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी दिली जाऊ नयेत, अशा सूचनाही नागरिकांतून केल्या जात आहेत. (प्रतिनिधी)