शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईप्रश्नी महाराष्ट्र गोव्याला मदत करेल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास

By अनंत खं.जाधव | Updated: November 30, 2023 14:40 IST

तीन राज्यात भाजप सत्तेवर येणार असल्याचाही केला दावा

सावंतवाडी: देशात पार पडत असलेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजप चांगली कामगिरी करीत असून तीन राज्यात भाजप सरळ सत्तेवर येईल तर दोन राज्यात चांगली कामगिरी करेल असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात गोवा नक्की जिंकेल आणि आम्हाला महाराष्ट्र ही मदत करेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री सावंत हे कुणकेरी येथे देवदर्शना निमित्त आले होते. त्यावेळी माजी आमदार राजन तेली यांच्या सावंतवाडीतील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आमदार राजन तेली  प्रथमेश तेली,मनोज नाईक, अजय गोंदावळे, आनंद नेवगी,दिलीप भालेकर,बंड्या सावंत,प्रमोद सावंत,सुधीर आडिवरेकर, अमित परब, केतन आजगावकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले,देशात पाच राज्यात निवडणूका होत असून यातील चार राज्यात मी स्वता प्रचाराला गेलो होतो.त्यामुळे मला तेथील स्थिती माहीत आहे.नक्कीच आम्ही तीन राज्यात विजयश्री मिळवू तर तेलंगणा आणि मिझोराम मध्ये चांगली कामगिरी करू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

म्हादई प्रश्नी गोवा सरकार आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात जोमाने माडत असून नक्कीच आम्हाला यश मिळेल बुधवारी न्यायालयात सुनावणी होती.पण ती पुढे ढकलली आहे.म्हादई च्या लढ्यात महाराष्ट्र सरकार ही आम्हाला मदत करेल असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच रूग्ण हे गोवा बांबुळी येथे येतात त्यांना तेथे पुरेसी आरोग्य सुविधा आपण देतो मात्र यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जन आरोग्य योजनेचे कार्ड हे सरकारी रूग्णालया बरोबर खाजगी रूग्णालयात ही त्याचा वापर झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन असे यावेळी त्यांनी सांगितले तसेच रोजगार मेळावा हा सरकार घेऊ शकत नाही एखाद्या खाजगी संस्थेने पुढाकार घ्यावा आम्ही सर्व प्रकारे मदत करू असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत