शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दापोली तालुक्यात व्यापाऱ्याचे अपहरण, सुटका; सहा अटकेत

By admin | Updated: November 11, 2015 23:41 IST

अपहरणकर्ते सुपारीदादा : चित्रपट दृश्याला शोभेल असा थरार

खेड : चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे एका चिरेखाण व्यावसायिकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न सहाजणांनी केल्याचा प्रकार बुधवारी दापोली तालुक्यातील उन्हवरे फाटा येथे घडला. काही जागरूक ग्रामस्थांनी हा प्रकार तत्काळ पोलिसांच्या कानावर घातल्याने खेडमध्ये पोलिसांनी फिल्डिंग लावून अपहरणकर्त्यांची इनोव्हा अडविली आणि चिरेखाण व्यावसायिक रूपेश बाजीराव पवार यांची सुटका केली. अपहरण करणाऱ्या सहाजणांना गजाआड करण्यात आले आहे. ते सुपारी घेऊन अशी कामे करणारे मुंबईतील सराईत असल्याची माहिती पुढे येत आहे.दापोली तालुक्यातील गावतळे येथील चिरेखाण व्यावसायिक रूपेश पवार (वय ३५) आपल्या बोलेरो गाडीतून दापोलीहून गावतळेकडे जात होते. वाकवली दरम्यान उन्हवरे फाटा येथून ते पुढे निघाले, तेव्हा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून काहीजण खाली उतरले. त्यांनी पवार यांची गाडी अडवली. आपण सीबीआय आॅफिसर असल्याची बतावणी करीत त्यांनी पवार यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर इनोव्हा कारमध्ये कोंबले.यावेळी चांगलीच झटापट झाली. ही झटापट तेथील काही लोकांनी पाहिली. त्यांनी तेथून काही अंतरावर असलेले सामाजिक कार्यकर्ते नीलेश शेठ यांना दूरध्वनीवरून कळविले. नीलेश शेठ यांनी तत्काळ खेड पोलिसांना हा प्रकार कळविला. खेड पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच फिल्डिंग लावली. पोलीस कर्मचारी आप्पा दाभोळकर, नरेंद्र चव्हाण आणि अनंत मयेकर यांनी खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे इनोव्हा कार अडवली आणि रमेश पवार यांची सुटका केली. इनोव्हामधील सहा अपहरणकर्त्यांसह गाडी (पान ५ वर)अटक केलेल्यांची नावेयाप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये अब्दुल हमीद सय्यद अहमद (विक्रोळी, मुंबई), गफार हमीद जहरअली, अनस सागर खान (कोपरखैरणे, नवी मुंबई), यतीन चिंतामणी चौगुले (डोंबिवली) पंकज लिंबू (ऐरोली, नवी मुंबई) शेख आबीद गफूर रौब (विक्रोळी, मुंबई) यांचा समावेश आहे. व्यावसायिक भागीदारीतून घटना ?फिर्यादी रूपेश बाजीराव पवार आणि चिपळूण येथील अश्विन मोरे यांची (कोळबांदरा, ता. दापोली) येथील चिरेखाण व्यवसायामध्ये भागीदारी होती. गेली दोन वर्षे या दोघांमध्ये इस्टेटसंबंधी मतभेद होते आणि सतत वादही होत होते. त्यावरून त्यांचे भांडणही झाले होते. हे भांडण मिटविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. यातूनच आपल्यावर मारेकरी पाठविल्याचा संशय पवार यांनी व्यक्त केला आहे.