शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजय सावंत यांच्याकडून कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटी

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

सोमवारी देवगड येथे जुन्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या

कणकवली : आमदार विजय सावंत यांनी सोमवारी देवगड येथे जुन्या कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. सिंधुदुर्गात सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार सावंत यांनी घेतलेल्या या भेटींमुळे तर्कवितर्क लढविण्यात येत होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी आमदार विजय सावंत यांनी स्वपक्षीय नेते नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली होती. आमदार सावंत यांच्या नियोजित साखर कारखान्याला नारायण राणेंच्या गोटातून झालेल्या विरोधाने चवताळलेल्या आमदार सावंत यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध आरोपांची सरबत्ती केली होती. आताही कॉँग्रेसअंतर्गत वेगाने घडामोडी होत आहेत. नीतेश राणेंनी राणेसमर्थकांवरच तोंडसुख घेतल्याने काही समर्थक नाराज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांच्या शिवसेनाप्रवेशाची चर्चा जशी रंगत आहे. तशी नारायण राणेंच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राणेंच्या पक्षबदलाचीही चर्चा झडू लागली आहे. निलेश राणेंच्या पराभवाने नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातील ताकदीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेची गणिते बदलली जाण्याच्या शक्यतेने आमदार सावंत यांनी भेटीगाठी सुरू केल्याची चर्चा सोमवारी राजकीय गोटात रंगली होती. त्यामुळे सावंत यांच्या भेटीगाठीला महत्व आले आहे. (प्रतिनिधी)कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विकास महामंडळ करावेसंस्थेचा वर्धापनदिन : जिल्हास्तरीय महिला मत्स्य व्यावसायिकांच्या मेळाव्यात मागणी वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार ज्या गावात मासेमारी करतात, ती गावे मच्छीमार गावे घोषित करावीत व कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विकास महामंडळ स्थापन करावे, अशी एकमुखी मागणी सोमवारी वेंगुर्लेत झालेल्या जिल्हास्तरीय महिला मत्स्य व्यावसायिकांच्या मेळाव्यात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी येथील साई मंगल कार्यालयात महिला मत्स्य व्यावसायिकांच्या स्रेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संंस्थेचे संस्थापक चंद्रशेखर उपरकर, उपाध्यक्ष श्वेता हुले, माजी पंचायत समिती सदस्य अर्चना हडकर, नगरसेविका अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर, चेतना केळूसकर, निकिता रेडकर, उद्योजक प्रकाश तांबोसकर, प्रा. जय क्षीरसागर, शिल्पा केळुसकर, ज्योती गिरप, पेरपेत्तीन डिसोजा, श्रमिक मच्छीमार संस्थेचे संघटक दिलीप घारे, हर्षदा देवधर, डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते. मच्छिमारांना दरवर्षी मत्स्य दुष्काळास सामोरे जावे लागते. मात्र, याकडे शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडतो. यावर उपाय म्हणून मच्छिमारांनी पारंपरिक मच्छिमारीबरोबरच कृत्रिम मत्स्यपालन व्यवसाय केल्यास याचा चांगला फायदा मच्छिमारांना होऊ शकतो, असे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. केरोसिन, मच्छीमार्केट सुविधा याबरोबरच मच्छिमारांच्या २१ मागण्या आहेत. संस्थेच्या प्रयत्नामुळे यातील तीन-चार मागण्या आतापर्यंत पूर्ण झाल्या. उर्वरित मागण्या प्रलंबित आहेत. पाँडेचेरी, तामिळनाडू, केरळ येथील मच्छीमार संघटीत असल्याने तेथे विकास झाला. येथील मच्छिमारांनीही अशाप्रकारे संघटीत होऊन आपल्या न्याय मागण्यांसाठी झटले पाहिजे. आज मत्स्य खात्याकडे मत्स्य व्यावसायिकांसाठी कोणत्याही योजना नसल्याचेही उपरकर यांनी स्पष्ट केले. मच्छीमारांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी मच्छीमार महिलांनी प्रथम संघटीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक महिला मच्छीमारांनी संस्थेचे सदस्य व्हा. तसेच सुकळवाड येथे लवकरच फिश गॅलरी निर्माण करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे संंस्थापक चंद्रशेखर उपरकर यांनी यावेळी सांगितले. तसेच यासाठी सर्वांचे संघटीत प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.अ‍ॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी महिलाविषयक कायदे, डॉ. हर्षदा देवधर यांनी महिलांचे आरोग्य, डॉ. प्रसाद देवधर यांनी महिलाविषयक विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. जय क्षीरसागर, अर्चना हडकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्वेता हुले यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य महिला मत्स्य व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)