शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव आंबेखोल येथे खासदार विनायक राऊत यांचे शिवसेना-भाजपा युतीच्यावतीने फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत करण्यात आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथमच शिरगांवला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खासदार विनायक राऊत व आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत युतीच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आमदार-खासदार या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या भेटीने युतीच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य पसरले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, शाखाप्रमुख रघुनाथ साटम, शेवरे शाखाप्रमुख सुधाकर साटम, आबू तावडे, पांडूशेठ साटम, उत्तम तावडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस मंगेश लोके, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, शिरगांव जिल्हा परिषद गटप्रमुख संतोष फाटक, हरिश्चंद्र चव्हाण, महेश शिरोडकर यांच्यासह शिवसेना-भाजपा युतीचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राऊतांच्या भेटीने शिरगावात जल्लोष
By admin | Updated: June 22, 2014 01:44 IST