शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द

By admin | Updated: June 2, 2016 00:59 IST

आरोग्यमंत्र्यांकडे शिफारस : कोकणातील डॉक्टरांचा अनुशेष भरून काढण्यासाठी घेतला निर्णय

सुभाष कदम / चिपळूण रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याची जिल्ह्याबाहेर बदली न करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे ही मागणी केली होती. ही मागणी तत्त्वत: मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. कोकणात अनेक गावे दऱ्या खोऱ्यात व शहरापासून लांब डोंगराळ भागात आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची अवस्था अतिशय बिकट असते. राहायला चांगल्या खोल्या नाहीत की, गावात कोणत्या सोयीसुविधा नाहीत. जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे सेवा करतात, त्यांच्याच नशिबी हा वनवास आलेला असतो. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या सोयीसुविधा नसतात. ग्रामीण भागात रुग्ण कधीही येतात. त्यांना सेवा द्यावीच लागते. एखाद्याला नाही म्हटले तर वेळप्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणही होते. तरीही अनेक वैद्यकीय अधिकारी आपल्या नोकरीला प्राधान्य देत इमानेइतबारे सेवा करतात. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अनेक वैद्यकीय अधिकारी मोठ्या शहरात किंवा सोयीच्या ठिकाणी काम करायला प्राधान्य देतात. शासनाने नुकत्याच नियुक्त केलेल्या ४८२ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासन पाठवेल तेथे काम करू असे करारपत्र शासनाला दिले आहे. त्यांच्या कराराप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये हे वैद्यकीय अधिकारी काम करू शकतात; परंतु त्या ४८२ पैकी एकाही वैद्यकीय अधिकाऱ्याला रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नियुक्ती दिलेली नाही. जर यापैकी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली असती तर येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबाकडे जाता आले असते. वर्षानुवर्षे कुटुंबापासून लांब राहून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या या अधिकाऱ्यांची आता अडचण झाली आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या किंवा संवेदनशील किंवा अडचणीच्या भागात जे वैद्यकीय अधिकारी काम करतात, त्यांना एक स्तर वेतन श्रेणी वाढ व प्रवास भत्ता दिला जातो. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्थितीही तशी नाही. या भागात नवीन वैद्यकीय अधिकारी येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाने ही सुविधा द्यायला हवी, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांमध्येही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अनेक नवीन वैद्यकीय अधिकारी या भागात येऊ इच्छित नाहीत आणि आले तरी तत्काळ बदली करून निघून जातात. काही येथे सोयीसुविधा नसल्याने सोडून जातात. त्यामुळे येथील प्रश्न कायम आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा असल्याने पालकमंत्री वायकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यानुसार हा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न येथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ नाही किंवा बदल्याही नाहीत हे धोरण अयोग्य आहे. शासनाने यापेक्षा संपूर्ण राज्यातील बदल्या रद्द करायला हव्या होत्या. केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रयत्न असल्याचे काहींनी सांगितले.