शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मिटवुनी अंधार, आदिवासी गावांमधे केले तेजोमय घरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 12:00 IST

ग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हसआणि जाणीव यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला आदिवासी गावांमधे सौर दिवे लावून मिटवुनी अंधार, करू तेजोमय घरदार हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हस, जाणीव संस्थांचा उपक्रम पालघरमधील मोखाडा तालुक्यात ५0 कुटुंबांना सौर दिव्यांचे वाटपदिवाळीमध्ये संस्थांकडून आदिवासींना अनोखी भेट

सिंधुदुर्गनगरी , दि. १९ :  ग्लोबल मालवणी, लाईटनिंग लाईव्हस आणि जाणीव यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला आदिवासी गावांमधे सौर दिवे लावून मिटवुनी अंधार, करू तेजोमय घरदार हा उपक्रम राबविण्यात आला.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील काष्टी आणि पाचघर या गावांमधील ५० गरजू कुटुंबांच्या घरांमधे सौर दिवे बसविण्यात आले आणि दिवाळीमध्ये येथील आदिवासींना या संस्थांनी अशी अनोखी भेट दिली.

सुरुवातीला जाणीव संस्थेचे मनोज पांचाळ यांनी प्रास्ताविक केले. सुख देवाण-घेवाणीतून मिळते. तुम्ही गरजवंत आहात म्हणून ग्लोबल मालवणी आणि लाईटनिंग लाईव्हचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत मदत पोहोचवू शकले आणि जाताना आपल्यासोबत तुमचे आशीर्वाद घेऊन जाणार आहेत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

ग्लोबल मालवणीचे अध्यक्ष सचिन आचरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शहरांपेक्षा गावात माणुसकीचे दर्शन जास्त घडते, तुम्ही मनाने श्रीमंत आहात आणि गावदेखील सुंदर आहे. ते असेच सुंदर आणि स्वच्छ ठेवा हा संदेश दिला. लाईटनिंग लाईव्हसचे अमित सिंघ आणि कृपा चतुर्वेदी यांनी गावकºयांशी मराठीत संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

गावात सातवीपर्यंतच शाळा असल्याने आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी जवळपास ८ किलोमीटर चालत जावे लागत असल्याने विशेषत: मुलींचे शिक्षण बंद होते. घरातील स्त्री शिक्षित असेल तर मुलांना ती शिकवू शकते असा विश्वास यावेळी त्यांनी दिला. सौर दिव्याचा प्रकाश केवळ घरात नाही तर डोक्यात पडायला हवा या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

पाचघर गावातील शाळेचे शिक्षक वाघमारे यांनी जाणीव संस्थेचे गावकऱ्यांशी असलेले ऋणानुबंध विषद केले. त्यानंतर योगेश बोराडे यांनी सहज व सोप्या भाषेत सौर दिव्याच्या वापरासंबंधी प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दिले.

काष्टी गावातील गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. यावेळी गावातील एका छोट्या छाया नावाच्या मुलीने म्हटलेल्या गाण्याला उपस्थितांनी दाद दिली. यावेळी पाचघर शाळेच्या मुलांनी लाकडापासून बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन शाळेच्यावतीने ठेवण्यात आले होते. त्या लाकडापासून बनविलेल्या वस्तूंमधून मुलांमध्ये असलेल्या कौशल्याची जाणीवही सर्वांना झाली.

जाणीवचे अध्यक्ष मनोज पांचाळ यांनी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. ज्या दानवीरांनी या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य केले त्यांचे ग्लोबल मालवणीचे अध्यक्ष सचिन आचरेकर आणि लाईटनिंग लाईव्हसचे योगेश बोराडे यांनी आभार मानले.

१00 पेक्षा जास्त जणांचा हातभारपरतीच्या प्रवासावेळी अनेक गावकरी निरोप देण्यासाठी जमा झाले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जवळपास १०० पेक्षा जास्त जणांनी आर्थिक हातभार लावला. जाणीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला हा उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी ग्लोबल मालवणीचे सदस्य प्रफुल्ल मोरे, उत्तम मयेकर, अभिषेक मुणगेकर, विजय पांचाळ, श्रुती उरणकर, शर्मिला केसरकर, संजय चव्हाण, रंजन रेवंडकर, निलेश वालकर, गणेश गावडे, वसंत परब, संदीप सुतार आणि डॉ. प्रसाद गोलतकर तर लाईटनिंग लाईव्हसच्यावतीने रोशनी गुप्ता, अमित सिंघ, रश्मी चतुर्वेदी, योगेश बोराडे, अंकिता दळवी, कृपा शुक्ला, प्रतीक जानी, तृप्ती कदम यांनी प्रयत्न केले.पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील काष्टी आणि पाचघर या गावांमधील ५० गरजू कुटुंबांच्या घरांमध्ये सौर दिवे बसविण्यात आले आणि दिवाळीमध्ये येथील आदिवासींना ग्लोबल मालवणी,लाईटनिंग लाईव्हस आणि जाणीव या संस्थांनी अनोखी भेट दिली.

 

टॅग्स :diwaliदिवाळीRaigadरायगड