शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सागरी सुरक्षा रामभरोसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 23:36 IST

रत्नागिरीतील चित्र : १० पैकी दोनच गस्तीनौका कार्यरत; ३६ लॅँडिंग पॉइंटवर सीसीटीव्ही बसविणार : वायकर

रत्नागिरी : दहापैकी केवळ दोनच गस्तीनौका कार्यरत असल्याने रत्नागिरीची सागरी सुरक्षा रामभरोसेच असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलेल्या पाहणीत पुढे आले. मुंबईतील २६/११ च्या अतिरेकी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी बुधवारी सकाळी दीड तास भगवतीबंदर जेटी परिसरात सागरी सुरक्षिततेची झाडाझडती घेतली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सागरी हद्दीतील ३६ लॅँडिंग पॉइंट व अन्य संवेदनशील ठिकाणी एक कोटी खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी घोषणा वायकर यांनी केली. २६/११ ला अतिरेक्यांनी सागरी सुरक्षा भेदून मुंबईत प्रवेश केला व अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याआधी रायगडच्या दिघी येथे स्फोटके उतरवून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत सागरी सुरक्षा भक्कम करण्यावर शासनाने भर दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर गस्तीसाठी विविध खात्यांच्या मिळून दहा वेगवान गस्तीनौका पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, त्यातील केवळ दोन नौका सुरू असल्याचे पालकमंत्र्यांना तपासणीत आढळून आले. जिल्ह्याची सागरी सुरक्षा भक्कम असणे आवश्यक असल्याने पोलीस दलाला आवश्यक साधने उपलब्ध करून दिली जातील. सागरी गस्तीनौकांना इंधन उपलब्ध करून दिले जाईल, असे वायकर यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी गस्तीनौकांवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी यावेळी जाणून घेतल्या. भगवती बंदरातील विविध खात्यांच्या गस्तीनौका बंद का आहेत, याबाबत त्यांनी त्या खात्यांकडून अहवाल मागविला आहे. तब्बल दीड तास त्यांनी गस्तीनौकेतून सागरी सुरक्षिततेची पाहणी केली. समुद्रात त्यांनी मच्छिमारांशीही संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, तहसीलदार हेमंत साळवी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती खोडके उपस्थित होते.मिरकरवाडा परिसरातील स्वच्छता व्यवस्थेचादेखील त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी या परिसरात नगरपरिषदेने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)आधुनिक शस्त्रे आणि पेट्रोल पंपसागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस दलास वाढीव मनुष्यबळाबरोबरच आधुनिक हत्यारे उपलब्ध करून देण्यात येतील. गस्तीनौकांसाठी इंधन उपलब्ध व्हावे याकरिता पेट्रोल पंप उभारण्याचा पोलीस दलाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही वायकर यांनी दिले आहे.