शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खंबाटातील मराठी कामगारांना देशोधडीला लावले! आमदार नीतेश राणे यांची  विनायक राऊतांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 19:05 IST

खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे.  मान्यताप्राप्त संघटनेची सही  कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा

ठळक मुद्देकणकवलीत पत्रकार परिषद

 

कणकवली : खंबाटा एव्हीएशन कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त संघटना आहे.  मान्यताप्राप्त संघटनेची सही  कामगार करारावर असते. त्यामुळे विनायक राऊत यांनी जनतेला अर्धसत्य सांगू नये. खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती. मात्र, भारतीय कामगार सेना व विनायक राऊत यांनी या कंपनीतील मराठी कामगारांना देशोधडीला लावले आहे, असा आरोप  आमदार नीतेश राणे यांनी येथे केला.

कणकवली येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र  समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस विहंग दळवी उपस्थित होते.       यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, खंबाटा कंपनीतील कामगारांच्या घामाचा पैसा त्यांना मिळू शकला नाही. याला  विनायक राऊतच जबाबदार आहेत. या कामगारांच्या पैशासंदर्भात महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने कामगार न्यायालयात दावा  दाखल केला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार किरण पावसकर, अंजली दमानिया यांनीसुद्धा राऊत यांनीच खंबाटामधील कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोप यापूर्वी केला आहे.

असे सांगतानाच आमदार राणे यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची याबाबतची व्हिडीओ क्लिप तसेच खंबाटा कंपनीच्या कामगारांचा सुमारे २ हजार कोटींचा पगार दिला नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्याची  व्हिडीओ क्लिपही यावेळी पत्रकार परिषदेत दाखविली. आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, भारतीय कामगार सेना या  मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाºयांची  सही  कामगार करारावर आहे.  खंबाटा कंपनीतील पगारवाढ महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेमुळे झाली होती.  कामगारांना  पगारावाढीचा तिसरा हप्ता मिळणार होता.

मात्र, भारतीय कामगार सेना युनियन लीडर विनायक राऊत यांनीच पगारवाढ देऊ नये असे पत्र व्यवस्थापनाला दिले आहे. त्यामुळे २०१४ सालचे प्रतिकामगार २ हजार रुपये असे १ हजार ६७३ कामगारांचे पैसे शिल्लक राहिले आहेत.  राऊत यांनी दिलेले पत्र लवकरच जाहीर करू तसेच त्या  पत्राच्या ५ लाख प्रति मतदारसंघात आम्ही वाटू. त्यामुळे नेमके सत्य जनतेसमोर येईल.

खंबाटा प्रकरणी सध्या ईडीची चौकशी सुरू आहे. त्यातूनही सत्य बाहेर येईल.   खंबाटा कंपनीच्या गरीब कामगारांच्या पगाराचे पैसे राऊत यांनी त्यांना मिळवून द्यावेत. अन्यथा राऊतांच्या जाहीर सभेतच खंबाटा कामगार त्यांना त्याबाबत जाब विचारतील, असेही  आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.