शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

मराठी नाट्यपरिषदेशी संस्थांनी संलग्न व्हावे

By admin | Updated: April 13, 2015 00:07 IST

रत्नागिरीतील रंगसंमेलनात निघाला सूर

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या मध्यवर्ती मुंबई शाखेवर रत्नागिरीतील तीन रंगकर्मी गेली दोन वर्षे कार्यरत आहेत. नाट्य चळवळ सशक्त होण्यासाठी परिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. परंतु, खऱ्या अर्थाने नाट्य परिषद बळकट होण्यासाठी जिल्ह्यातील विविध नाट्यसंस्था व त्यांच्या सदस्यांनी परिषदेशी सलग्न होण्याची आवश्यकता आहे, अशी भावना रंगसंमेलनातून व्यक्त करण्यात आली.मराठी नाट्य परिषद आयोजित रंगसंमेलन कार्यक्रमात हा सूर उमटला. मध्यवर्ती मंडळाच्या नियामक शाखेचे सहकार्यवाह दादा वणजू, सदस्य आसावरी शेट्ये, सतीश दळी व्यासपिठावर उपस्थित होते. व्यासपीठ व प्रेक्षागृहातील रंगकर्मीमध्ये संवाद साधण्यात आला. कोकणात चित्रीकरण वाढत आहे. त्यांना स्थानिक कलाकारांची आवश्यकता भासते. परंतु, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या शिफारशीनुसार कलाकरांची निवड करण्यात येत असल्याने कलांकारांनी आपली माहिती शाखेकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रंगसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी वसंत गंगावणे, प्रा. सुजन शेंड्ये, प्रज्ञा चवंडे यांच्याहस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रास्ताविक दादा वणजू यांनी केले.सूजन शेंड्ये यांनी मार्गदर्शन करताना सुरूवातीच्या काळात एक दोन संस्था कार्यरत होत्या. मात्र सध्या जिल्ह्यात नाट्यचळवळ फोफावत आहेत भविष्यात ती अधिक वृध्दिंगत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी नाट्यसंस्था व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. संगीत राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारी राधाकृष्ण कलामंच संस्था व वैयक्तिक बक्षिसांमध्ये प्रेरणा दामले, संजय गणपुले, प्रशांत साखळकर, खल्वायनेच्या ‘प्रीतीसंगम’ नाटकातील अजिंक्य पोंक्षे, श्वेता जोगळेकर, सहयोग संस्थेच्या सिध्दी बोंद्रे, संकल्प कलामंचची रौप्यपदक विजेती प्रज्ञा चवंडे, राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागातील नंदू भारती, तसेच सेन्सॉर बोर्डवर नियुक्ती झालेले दाक्षायणी बोपर्डीकर व मिलिंद टिकेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी ‘सॉर्केटिस ते दाभोळकर-पानसरे व्हाया तुकाराम’ रिंगण नाट्याचा ६९वा प्रयोग सादर केला. (प्रतिनिधी)