शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मडुरा येथे मांगर, दुकानाला आग

By admin | Updated: June 7, 2017 00:14 IST

मडुरा येथे मांगर, दुकानाला आग

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : मडुरा-माऊली मंदिरासमोरील मांगर व दुकानाला आग लागून मांगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात दुकानातील सामान जळून सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मडुरा-परबवाडी येथील चंद्रकांत महादेव गावकर यांचा माऊली मंदिरासमोर मांगर आहे. त्या मांगरातच लाकडी दुकान व हॉटेल आहे. नेहमीप्रमाणे गावकर हे सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास मांगराला भीषण आग लागली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास गोव्यातून ड्युटी आटोपून येणाऱ्या युवकाच्या दृष्टीस हे दृश्य पडले. त्याने स्थानिक युवकांना मोबाईलवरून आगीची माहिती दिली. युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मांगर व दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.गावकर यांनी मडुरा तलाठी एन. बी. दळवी यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी नुकसानीची पाहणी केली. मांगर पूर्णपणे आगीत खाक झाला होता. शिवाय मांगरातील लाकडी दुकान, दुकानातील फ्रीज, स्टेशनरी वस्तू, कडधान्ये, कोल्ड्रिंक्स आगीत जळून खाक झाली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा दावा वीज वितरणचे वायरमन यांनी केला, तर ग्रामस्थांनी विद्युतभारित वाहिन्यांमध्ये स्पार्किंग होऊन आग लागल्याचा आरोप केला. शिवाय जास्त क्षमतेची तार फ्युजमध्ये वापरण्यात आल्याने स्पार्किंग झाल्यानंतर फ्यूज उडाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. वीज वितरणचे सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी मडुरा दशक्रोशी उत्कर्ष समिती अध्यक्ष सुरेश गावडे, प्रकाश शेर्लेकर, पोलीस पाटील नितीन नाईक, नारायण परब, दिलीप परब, उपसरपंच उल्हास परब, संदीप परब, बंटी गावकर, अतुल गावकर, दिनेश परब, रामा परब, बाळू गावडे, बब्या परब, कोतवाल नाना वेंगुर्लेकर, दिलीप घाडी, तात्या शेर्लेकर, जगन्नाथ परब आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दुर्घटनेने गावकर कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.ग्रामस्थांनी दिला मदतीचा हातचंद्र्रकांत गावकर यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. दुकानाच्या उत्पन्नातूनच ते कुटुंब चालवितात. आगीत दुकान खाक झाल्याचे समजताच ते पूर्णपणे कोलमडले. यावेळी स्थानिकांनी त्यांना धीर देत चार दिवसांत पुन्हा दुकान उभे करून देण्याचा शब्द दिला. त्यादृष्टीने मदत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. काही ग्रामस्थांनी श्रमदान करण्याची ग्वाही दिली.