असगोली : दिवाळीतील काही दिवस पाऊस कोसळल्यानंतर गेले दोन दिवस वातावरणात थंडावा जाणवत आहे. आंबा मोहोरासाठी पोषक अशा थंडीने हजेरी लावल्याने तालुक्यातील आंबा बागायतदारांची साफसफाई व फवारणीच्या कामाची घाई वाढली आहे. आंब्यावर मोहोर आल्यास त्याचे तुडतुड्यांपासून संरक्षण करण्यासाठी आंबा बागायतदारांनी आतापासूनच कंबर कसली आहे.गुहागर तालुक्यातील भातशेतीची कामे जवळजवळ पूर्ण होत आली आहेत. बहुतांश काही ठिकाणाच्या शेतकऱ्यांनी वेगवेगळे पेरे करण्यासही सुरूवात केली आहे. दिवाळीत पावसाने अचानक सुरूवात केल्याने शेतकऱ्यांबरोबरच आंबा बागायतदारही धास्तावला होता. मात्र, दोन - तीन दिवसानंतर थंडीने सुरूवात केली.आंबा मोहोरासाठी पोषक थंडी असल्याचे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. उशिरा सुरू झालेला पाऊस यावर्षी चांगल्या प्रमाणात पडल्याने थंडीही जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे. या थंडीचा फायदा घेत आंबा बागायतींचे तुडतुड्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी बागायतदार फवारणीच्या कामांकडे वळला आहे. (वार्ताहर)थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवीत.आंब्यावर पडणाऱ्या तुडतुड्या रोगापासून संरक्षण होण्यासाठी बागायतदारांनी कसली कंबर.भातशेतीचे काम अंतिम टप्प्यात.आंबा मोहोरासाठी पोषक थंडी पडत असल्याचे आंबा बागायतदारांचे मत.दिवाळीदरम्यान पडणाऱ्या पावसामुळे बागायतदार धास्तावला.आंबा बागांची साफसफाईचे काम जोरात सुरु.
आंबा बागायतदारांची लगबग
By admin | Updated: November 7, 2014 23:44 IST