शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गमधील ग्रामीण मार्ग चिखलाने माखले

By admin | Updated: August 29, 2014 23:09 IST

गणेशोत्सवातही प्रशासन सुस्तच

वैभव साळकर - दोडामार्ग -गणेशोत्सवाच्या कालावधीतही तालुक्यातील जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गांची जिल्हा परिषद बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशरक्ष: वाताहात झाली आहे. तालुक्यातील झोळंबे-कुडासे, मणेरी- कुडासे, भेडशी- उसप- पिकुळे, साटेली, खोक्रल- मांगेली, वझरे-तळेखोल आदी महत्त्वपूर्ण रस्त्यांची देखभाल दुरूस्तीच होत नसल्याने रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झाडी आणि डांबरीकरण रस्त्यावर मातीची मलमपट्टी केली जात असल्याने हे सर्व मार्ग पावसाळ्यात सर्वत्र चिखलाने माखल्याने दयनीय अवस्था झाली आहे.दोडामार्ग तालुका निर्मितीच्या एका तपानंतरही अद्याप रस्ते निर्मिती आणि रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करणारे जिल्हा परिषदचे बांधकाम विभाग कार्यालय दोडामार्गात कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याचा कार्यभार ५० ते १०० किलोमीटर अंंतरावरून म्हणजेच पूर्वीच्या सावंतवाडी तालुक्यातून हाकला जात आहे. परिणामी नागरिकांच्या पायाभूत सुविधेतील रस्ते सुविधेच्या मूळ उद्देशालाच खो घातला जात असल्याचे चित्र आहे. गतिमान प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे वजन यामुळे नवख्या दोडामार्ग तालुक्यातील खेडोपाड्यात नवीन रस्त्यांची निर्मिती झपाट्याने होत असली तरी पूर्वी साकारलेल्या जिल्हा आणि ग्रामीण मार्गांची वाताहात सुरू आहे. झोळंबे-तळकट, कुंब्रल ते कुडासे हा तळकट दशक्रोशीतील अनेक गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेला रस्ता आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून या रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी नागरिक करत आहेत. मात्र, त्याकडे बांधकामने साफ दुर्लक्ष केले आहे. डांबरीकरण रस्त्यावरील खड्डे मातीने बुजविले. रस्त्याची साईडपट्टी उखडल्याने आणि रस्त्यावरील मोऱ्याही ढासळल्याने या मार्गावरील वाहतूकही धोक्यात आहे.तर भेडशी ते उसप-पिकुळे, मणेरी-कुडासे आणि साटेली-खोक्रल मांगेली या रस्त्यांचीही अवस्था देखभाल दुरूस्तीअभावी कमालीची बिकट बनली आहे. यामार्गावरही खड्यांचेच जाळे विणले गेल्याने रस्त्यांची चाळण बनली आहे. उसप-पिकुळे रस्त्याच्या डागडुजीसाठी गतवर्षी रस्त्याच्या कडेला खडी टाकण्यात आली. मात्र, त्या रस्त्यांची डागडुजी झालेली नाही. त्यामुळे बांधकाम खात्याची बेपर्वाई याठिकाणी अधोरेखित होते. दिवसेंदिवस गतिमान होणारे प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी अनेकाअंगी योजना राबवित असताना संबंधित खात्याचे अधिकारी मात्र सुस्तच असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.