शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी संघटनात्मक प्रयत्न करावेत

By admin | Updated: December 15, 2015 23:43 IST

विलास गुडेकर : मळगावातील कुंभार समाज मेळाव्यात बांधवांना मार्गदर्शन

तळवडे : जिल्ह्यातील कुंभार समाजातील बांधवांनी एकजूट करत एकीने विकास साधण्यासाठी संघटनात्मक पातळीवर कार्य करावे. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे वळून शासकीय नोकऱ्यात बाजी मारावी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष तसेच कोकण विभाग उपाध्यक्ष विलास गुडेकर यांनी व्यक्त केले. मळगाव येथे संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सावंतवाडी व जिल्हा मंडळातर्फे कुंभार बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी या तिन्ही तालुक्यातील समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष विलास गुडेकर, उपाध्यक्ष यशवंत शेंदुलकर, कणकवली पंचायत समिती उपसभापती बाबा वर्देकर, जिल्हा सचिव दिलीप हिंदळेकर, जिल्हा सल्लागार वासुदेव शिरोडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मनोहर कुंभार, काशिनाथ वेंगुर्लेकर, जानकी शिरोडकर, ज्येष्ठ गणेश मूर्तीकार विलास मांजरेकर, सावंतवाडी तालुका सचिव सुहास पिकुळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर व सावंतवाडी तालुका संत गोरा कुं भार समाज उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्याला सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील गणेश मूर्तिकार, उत्कृष्ट कारागीर तसेच शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कारागिरांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.त्याचप्रमाणे आज कोकणात विशेष करून जिल्ह्यात अनेक कुंभार समाज बांधव वीटभट्ट्या लावतात. पण पावसाळी हंगामात किंवा अतिवृष्टीने वीटभट्ट्यांचे नुकसान होते. याची नुकसान भरपाई मिळण्याकरिता कुंभार समाजाचे राज्य संघटना अध्यक्ष संजय राठे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे याची वेळी ३० डिसेंबर रोजी वेळ घेतली आहे. (प्रतिनिधी)मेळाव्यातील समाजाच्या मुख्य मागण्याकुंभार समाज हा इतर मागास प्रवर्गात येतो. या प्रवर्गात इतर मागास वर्गाची संख्या मोठी असल्याने कुंभार समाजातील लोकांना या योजनांचा हव्या त्या प्रमाणात फायदा होत नाही. त्यामुळे कुंभार समाजाला भटक्या जातीत समाविष्ट करण्यात यावे, संत गोरा कुंभार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, राज्य व जिल्हा स्तरावर, माती व कलाकृती समिती शासनाने स्थापन करावी, आयटीआयमध्ये कुंभार, कला विषय सुरू करावा, मंत्रिमंडळात कुंभार समाजातील प्रतिनिधींना सदस्यत्व (स्थान) द्यावे, अशा विविध मागण्या कुंभार समाज राज्य संघटना व जिल्हा संघटनेतर्फे शासनाकडे करण्यात आल्या.