शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासाचे सूक्ष्म नियोजन करा

By admin | Updated: January 20, 2015 00:09 IST

नारायण राणे : कणकवली नगरपंचायतीला भेटीत सूचना

कणकवली : शहरात निर्माण होणाऱ्या विविध समस्या लक्षात घेत विकासाच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली. राणे यांनी सोमवारी नगरपंचायतीला भेट दिली. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड.प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी राणे यांना व्यापाऱ्यांनी विविध समस्यांसंदर्भात निवेदन दिले. शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, व्यापाऱ्यांचे प्रश्न, इमारतींचे प्रश्न आदी प्रश्नांचे वाढत्या शहराच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन होणे गरजेचे असल्याचे राणे यांनी सांगितले. महामार्गाचे रूंदीकरण होत असून त्यामुळे महामार्गाशेजारील व्यापारी विस्थापित होत आहेत. त्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रश्न आहे. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकारी, मंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे राणे यांनी सांगितले. शहरातील फिरत्या विक्रेत्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नियमाप्रमाणे समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांसह पाच सदस्यांचा समावेश आहे. मात्र, अद्याप या समितीची बैठक झालेली नाही. या समितीनेच फिरत्या विक्रेत्यांसंदर्भात शुल्क आकारणे, त्यांचे झोन आदी निश्चिती करायची आहे. यासंदर्भात नगरपंचायत बैठकीत ठराव घेऊन लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्याची माहिती अ‍ॅड. खोत यांनी दिली. परप्रांतीय व्यापारी शहरात येत आहेत. परप्रांतीय व्यापारी मुजोरपणा करत असल्याने काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. परप्रांतीय व्यापाऱ्यांना देण्यात येणारे दाखले काटेकोरपणे द्यावेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. (प्रतिनिधी) पथदीपांना ‘टायमर’ बसविणार : नगराध्यक्षा वीज बचत करण्यासाठी शहरातील पथदीपांना एलइडी दिवे बसवण्यात आले आहेत. आता सर्व पथदीपांना ‘टायमर’ आणि वीज मीटर बसवण्यात येणार आहेत. ज्यामुळे फक्त आवश्यक त्या वेळी पथदीप सुरू होऊन आपोआप बंद होतील. यामुळे वीजेचा अपव्यय टळणार आहे, असे कणकवलीच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. खोत सांगितले.