शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण कंपनीच्या थकबाकीमध्ये कमालीची घट

By admin | Updated: November 30, 2015 01:08 IST

आॅनलाईनचा परिणाम : परजिल्ह्यात राहणाऱ्या ग्राहकांसाठीही चांगला पर्याय--महाप्रकाश आशेचा- ३

मेहरून नाकाडे --रत्नागिरी  -कोकण परिमंडलात चांगल्या सुविधा येण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी वेळ व पैशांचा अपव्यय टाळण्याकरिता आॅनलाईन सुविधा सुरु करण्यात आली. शिवाय स्वयंचलीत वीजबिल केंद्रदेखील सुरु करण्यात आली. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीमध्ये आता बऱ्यापैकी घट झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ४३ हजार ७१५, वाणिज्यचे ६ हजार २२४, औद्योगिकचे १४०१, शेतीपंप १३८७, सार्वजनिक पाणीपुरवठा ८९०, अन्य ७६५, पथदिवे २०६ मिळून एकूण ५४ हजार ५८८ ग्राहक आहेत. साधारणत: जिल्ह्यात ६ कोटी १३ लाखांच्या आसपास थकबाकी आहे. महावितरणचे वाढलेले ग्राहक व वीज युनिटचे वाढलेले दर यामुळे थकबाकीची संख्या आकड्यात अधिक असली तरी प्रत्यक्षात थकबाकीदार मात्र कमी झाले आहेत. घरगुती ग्राहकांची ३ कोटी ३२ लाख, वाणिज्यचे १ कोटी १८ लाख, औद्योगिकचे ७१ लाख, शेतीपंपचे ११ लाख २० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ५४ लाख ४० हजार, अन्य ११ लाख, तर पथदिव्यांची १३ लाख ७१ हजार थकबाकी शिल्लक राहाते. घरगुती ग्राहकांकडील थकबाकी कमी झाली आहे. औद्योगिक व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांचीच थकबाकी अधिक आहे. थकबाकी कमी करण्यासाठी महावितरणने २०१० साली देयक आॅनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच नेटबँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आदी पर्याय देण्यात आले. सुरुवातीला ३१० इतके ग्राहक या योजनेचा लाभ घेत होते. मात्र, ही संख्या आता वाढली असून, १८ हजार ५२३ इतकी झाली आहे. त्यामुळे सन २0१0मध्ये आॅनलाईनद्वारे महावितरणला ९ लाख २४ हजार ७८० इतका महसूल प्राप्त होत होता. त्यामध्ये आता कमालीची वाढ झाली आहे. सध्या आॅक्टोबर २०१५मध्ये आॅनलाईन वीजबिल भरल्याने महावितरणला २ कोटी ५० लाख ६६ हजार १२५ लाखाचा महसूल प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात घर असूनही नोकरी, व्यवसायानिमित्त परगावी राहणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक चांगला पर्याय महावितरणकडून उपलब्ध करुन देण्यात आल्याने महावितरणच्या महसूलामध्ये भर पडली आहे.बँकेच्या ग्राहकाला आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी एटीएमचा पर्याय दिला. त्याप्रमाणे महावितरणकडून जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या सोयीसाठी सप्टेंबर २०१२मध्ये नाचणे रोड येथे पहिले एटीपी केंद्र सुरु करण्यात आले. सुरुवातीला या एटीपी केंद्राची कार्यक्षमता मर्यादित ठेवण्यात आली होती. परंतु आता विस्तार वाढविण्यात आला आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, कणकवली, मालवण येथेही एटीपी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दापोली व खेड येथील एटीपी केंद्र ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी जूनपासून बंद करण्यात आली. परंतु रत्नागिरी, चिपळूण, कणकवली व मालवण येथील एटीपी केंद्रांवर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ती केंदॅ सुरु ओत. सुरुवातीला एटीपी केंद्रावरील ग्राहकांची दररोजची संख्या हजार ते १२०० इतकी मर्यादित होती. या केंद्रांवरील ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आॅक्टोबरमध्ये ३८ हजार ३३७ ग्राहकांनी एटीपी केंद्रावर वीजबिल भरल्यामुळे ५ कोटी ६६ लाख १५ हजार ५०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नोकरदार, व्यावसायिक, सेकंड होम धारक ग्राहक वर्षातून एक-दोनदा गावी येत असत. त्यावेळीच त्यांना थकबाकी भरणे शक्य होत असे. परंतु आता आॅनलाईनमुळे कुठूनही बिल भरणे सोयीचे झाले आहे. शिवाय एटीपीमुळे सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणे शक्य होत आहे. महावितरणच्या ग्राहक संख्येत वाढ होत आहे, तसेच आॅनलाईन, एटीपीमुळे महसुलात वाढ होऊन दिवसेंदिवस थकबाकी कमी होऊ लागली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती ४३ हजार ७१५, वाणिज्यचे ६ हजार २२४ ग्राहक.जिल्ह्यात ६ कोटी १३ लाखांच्या आसपास थकबाकी.आॅनलाईन बिल भरण्याकडे ग्राहकांचा वाढता कल.आॅक्टोबरमध्ये आॅनलाईन वीजबिल भरल्याने महावितरणला २ कोटी ५० लाख ६६ हजार १२५ लाखांचा महसूल प्राप्त.