शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरगतीने वैभववाडीवर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:02 IST

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडी तालुक्यातील सडुरेचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) (२९) यांना वीरगती आल्याने तालुक्यावर शोककळा पसरली. मेजर कौस्तुभच्या वीरगतीचे वृत्त कळताच त्यांचे सडुरे गाव सुन्न झाले. गेल्या वर्षीच्या गणशोत्सवातील भेट त्यांच्या येथील कुटुबीयांसाठी अखेरचीच ठरली आहे.सोमवारी रात्री उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा ...

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैभववाडी : उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडी तालुक्यातील सडुरेचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) (२९) यांना वीरगती आल्याने तालुक्यावर शोककळा पसरली. मेजर कौस्तुभच्या वीरगतीचे वृत्त कळताच त्यांचे सडुरे गाव सुन्न झाले. गेल्या वर्षीच्या गणशोत्सवातील भेट त्यांच्या येथील कुटुबीयांसाठी अखेरचीच ठरली आहे.सोमवारी रात्री उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये चार भारतीय जवान शहीद झाले. त्यात शहीद कौस्तुभ यांचा समावेश असल्याचे सायंकाळी कळताच वैभववाडी तालुकावासिय शोकसागरात बुडाले. परंतु, त्यांचे कुटुंब कायमस्वरुपी मुंबई येथे स्थायिक असल्याने गावाशी संपर्क कमीच होता. त्यामुळे शहीद कौस्तुभ राणे यांचे नक्की गाव कोणते याबद्दल संभ्रम होता. शेवटी ते सडुरेतील असल्याचे निष्पन्न झाले. त्यातही त्यांच्या वडिलांना गावात प्रकाश ऐवजी ‘कुमार’ या नावाने ओळखले जात असल्याने सुरुवातीला गोंधळाची स्थिती होती. मात्र, शहीद कौस्तुभ यांचे सख्खे चुलत चुलते माजी सरपंच विजय रावराणे यांनी मुंबईत संपर्क साधल्यानंतर खात्री होताच सूर्यास्ताला सडुरे गाव सुन्न झाले.शहीद कौस्तुभ हे एकुलते होते. सध्या ते मेजर पदावर होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून गतवर्षी ते पत्नीला घेऊन गणपतीचे दर्शन घेण्यास आले होते. त्यावेळी काही तासांचा त्यांचा सहवास कुटुंबीयांसह नातेवाईक व गावक-यांनाही लाभला होता. शहीद कौस्तुभ यांचे आईवडील कायमस्वरुपी मुंबईत वास्तव्यास असले तरी गावचे त्यांचे कुटुंब एकत्रच आहे. त्यामुळे कौस्तुभ यांच्या वीरगतीमुळे त्यांच्या संपुर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.देशासाठी शहीद झाल्याचा अभिमानशहीद कौस्तुभ राणे (रावराणे) सैन्यात अधिकारी असल्याने गावाकडे येणे फार होत नव्हते. तरीही पत्नीसह गेल्यावर्षीच्या गणपती उत्सवातील गौरीच्या सणाला ते आले होते. तेव्हा कुटुंबीयांसह एकत्र जेवण करुन ते मुंबईला गेले. प्रकाश ऊर्फ कुमार यांचा कौस्तुभ एकुलता असल्याने त्याचे वीरमरण हा आमच्या कुटुंबावर आघात असून दु:ख डोंगराएवढे आहे. त्याचबरोबर कौस्तुभ भारतमातेच्या रक्षणासाठी शहीद झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे उद्गार त्यांचे चुलते माजी सरपंच विजय रावराणे यांनी काढले.आज पार्थिव आणणारमेजर कौस्तुभ यांचे पार्थिव बुधवारी विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.पाकिस्तानला धडा शिकवामेजर कौस्तुभ राणे यांचे हौतात्म्य वाया जाऊ देता कामा नये. असे पराक्रमी लष्करी अधिकारी आणि जवान गमावणे परवडणार नाही. सीमेवर सतत कुरापती काढणारे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवला पाहिजे, असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.