शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

आधुनिक शिक्षण पद्धतीची कास धरा

By admin | Updated: December 27, 2016 01:02 IST

नारायण राणे : बांदा येथे दहावे ‘नवा विद्यार्थी कुमार साहित्य’ संमेलन

बांदा : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दीमत्ता आहे. मात्र, दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने आपले विद्यार्थी मागे पडत आहेत. शिक्षकांनी आजच्या तरुण पिढीला विज्ञान, तंत्रज्ञानाची ओळख करुन देतानाच कर्तव्य व जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. शालेय जीवनातच प्रगतीचे मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यायचे असल्यास आधुनिक शिक्षणपध्दतीची कास धरा असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी येथे केले.येथील खेमराज मेमोरियल प्रशालेत बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्यावतीने आयोजित १० व्या नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय कायदा मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्वासराव मेहंदळे, महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, बांदा शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाजकल्याण सभापती अंकुुश जाधव, आत्माराम पालयेकर, संदीप कुडतरकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, कल्पना तोरसकर, प्राध्यापक प्रवीण बांदेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, विनायक दळवी, स्वप्निल नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर, शशीकांत पित्रे, भाऊ वळंजू, अ‍ॅड. वसंत भणगे आदी उपस्थित होते. नारायण राणे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रमाकांत खलप यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बांदा शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रास्ताविक आबासाहेब तोरसकर यांनी केले. सूत्रसंचालन रश्मी नाईक, एस. व्हि. नाईक यांनी केले. आभार संस्थेचे सचिव एल. डी. सावंत यांनी मानले. (प्रतिनिधी)जगाप्रमाणे आपणही गतिमान व्हायावेळी बोलताना राणे म्हणाले की, कोकणात प्रगतीचे बरेच उद्योग आपण आणलेत. मात्र, कोकणी माणूस हा समाधानावर जगणारा असल्यामुळे कोकणची प्रगती झाली नाही. आज आपण शिक्षण घेताना कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतो आहोत, त्याचा भविष्यात काय उपयोग होईल याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. विविध क्षेत्रात कोकणी माणूस दिसावा हे आपले स्वप्न आहे. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये तल्लख बुध्दिमत्ता आहे, मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच महत्वाकांक्षा बाळगून त्यादृष्टीने शिक्षण घ्यावे. प्रामाणिकपणे मेहनत करुन त्याला बुध्दिमत्तेची जोड दिल्यास हे शक्य आहे. आपली प्रगती ही ज्ञानातूनच होईल. जसे जग गतिमान झाले, तसे आपणही गतिमान व्हा असे आवाहन राणे यांनी केले.