शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीला विजयी करण्याचे मुख्य ध्येय

By admin | Updated: July 18, 2014 22:55 IST

दिवाकर रावते : धामापूर येथे केले प्रतिपादन

चौके : जनतेमध्ये विश्वास निर्माण करून जनतेची सेवा करणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे व्रत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला पराभूत करायचे यापेक्षा महायुतीला विजयी करणे हेच मुख्य ध्येय आहे. त्यासाठी जनतेशी संवाद साधा, जनता तुमच्याच पाठीशी राहील. माझे जीवन संपले तर शिवसेनेकरिता संपेल हा माझा निर्धार आहे, असे प्रतिपादन शिवसेना आमदार दिवाकर रावते यांनी धामापूर येथे बोलताना केले. ते म्हणाले, शिवसेनेसाठी आजवर कोकणी माणसाने मोठा त्याग केलेला आहे. म्हणूनच शिवसेनेवर कोकणी माणसाचा तेवढाच अधिकार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदार नोंदणी, शिवसेना सदस्य नोंदणी, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे उद्दिष्ट समोर ठेवून भगवा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र हा उपक्रम आपल्यावर सोपवलेला आहे. तो यशस्वीपणे राबविणे हे प्रत्येक शिवसैनिकाचे कर्तव्य आहे. शिवसेनेतर्फे धामापुरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि त्यांना छत्र्यांचे वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना रावते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, विभागप्रमुख अनिल ढोलम, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, अशोक तेली, विजयकुमार धामापूरकर, दीपा पराडकर आदी उपस्थित होते. यावेळी धामापुरातील शिवसैनिकांच्यावतीने आमदार रावते यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शिवसैनिकांना शिवबंधन बांधण्यात आले. तसेच नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)