शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक

By admin | Updated: November 24, 2015 00:24 IST

आंबोली येथील प्रकरण : सावंतवाडीतून घेतले ताब्यात, दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सावंतवाडी : आंबोली येथील विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवाजी रामू कडूकर याला चंदगड येथून रविवारी अटक केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अतूल सोनबा कडूकर (वय २१, रा. असनोली, चंदगड) याला पोलिसांनी सोमवारी सावंतवाडीतून ताब्यात घेतले. या दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता २६ नोव्हेंबर पर्यत चार दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने ठोठावली. आंबोली येथील विवाहितेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पिडीत महिलेने आठवड्यापुर्वी पोलिसात तक्रार दिली होती. पण पोलिसांनी या प्रकरणात प्रथम थोडीशी सावध भूमिका घेतली होती. याच प्रकरणातील दिपक रावराणे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. त्यामूळे पोलिसांवर आरोपही झाले, मात्र गेले दोन दिवस तपासाची वेगाने सूत्रे फिरवत पोलिसांनी या प्रकरणातील शिवाजी रामू कडूकर (वय ३८) याला रविवारी चंदगड येथील घरातून ताब्यात घेतले. त्याच वेळी पोलिसांनी अतुल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याना तो घरात सापडला नव्हता. त्यामुळे नातेवाईकांनी अतुल सोनबा कडूकर याला सोमवारी हजर करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तो सावंतवाडीत येताच त्याला अटक करण्यात आली. या दोघानाही येथील न्यायालयात हजर केले असता २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केल्याने आता दिपक रावराणेबाबत पोलिस काय भूमिका घेतात? याबाबतचा पोलिसांचा तपास सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. तर दुसरीकडे अत्याचारित महिलेला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी बोलवूनही ती अद्यापपर्यंत आली नसल्याने पोलिसांजवळ वैद्यकीय तपासणीचा पेच कायम असून पोलिस आणखी एकदा अत्याचारित महिलेला लेखी देणार असून त्यानंतर ही महिला आली नाही, तर याबाबतचा अहवाल पोलिस न्यायालयाला देणार आहेत. (प्रतिनिधी)‘सखोल अभ्यास करणार’पोलिस आंबोली लैगिक अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास करणार असून या प्रकरणातील अनेक दुवे पोलिसांजवळ उघड होत आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये हे प्रकरण घडल्यानंतर एक वर्ष तक्रार का देण्यात आली नाही. तसेच तक्रार देण्यापूर्वी काय घडले याचीही माहिती घेण्यास सुरूवात केल्याचे पोलिस उपनिरिक्षक तोरस्कर यांनी स्पष्ट केले.आरोपींना कोणत्या उद्देशाने बोलावले होतेपोलिसांना आरोपींनी तक्रार दाखल होण्यापूर्वी काही दिवस अगोदर सावंतवाडीत एका घरात बैठक झाल्याची माहिती दिली असून या बैठकीत कोण कोण हजर होते याची माहिती आता पोलिस घेत असून या सर्वांचा जबाब नोंदवणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.