शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून युवतीची आत्महत्या

By admin | Updated: October 25, 2016 00:56 IST

वाफोली धरणात घेतली उडी : मृत महाविद्यालयीन विद्यार्थिनी गोव्यातील

बांदा : गोवा-शिरोडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सिद्धी राजेंद्र परब (वय २२, रा. विर्नोडा-गोवा) या युवतीने वाफोली (ता. सावंतवाडी) येथील धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. शिरोडा येथील तिच्या राहत्या खोलीत आत्महत्या करीत असल्याबाबतची चिठ्ठी सापडल्याने तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोेलिसांनी व्यक्त केला.सिद्धी परब ही युवती रविवारी सकाळपासून शिरोडा (गोवा) येथून बेपत्ता होती. याबाबतची तक्रार चुलत भाऊ प्रवीण कृष्णा परब याने फोंडा पोलिसांत दिली होती. फोंडा पोलिसांना रविवारी दुपारी युवतीचे मोबाईल लोकेशन महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथे मिळाले. युवतीचे आजोळ विलवडे येथे असल्याने तिचे शालेय शिक्षण विलवडे हायस्कूल येथे झाले होते. त्यामुळेच ती आपल्या आजोळी गेल्याचा अंदाज नातेवाइकांनी व्यक्त केला. मात्र, सायंकाळपर्यंत ती येथे न पोहोचल्याने नातेवाइकांनी अन्यत्र शोधाशोध केली. मात्र, ती सापडू शकली नाही.दरम्यान, अज्ञात युवतीची पर्स व चपला वाफोली धरणाच्या विहिरीवर स्थानिकांनी पाहिल्या. ही माहिती समजताच युवतीचे मामा अनिल सावंत यांनी विलवडे ग्रामस्थांसह धरणावर धाव घेतली. पर्समध्ये शिरोडा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे ओळखपत्र सापडले. त्यावरून खात्री पटली. मात्र, अंधार असल्याने धरणातील पाण्यात शोधमोहीम राबविण्यात आली नाही. सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास धरणाच्या पाण्यात सिद्धीचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत सापडला. बांदा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. तिच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. (प्रतिनिधी)चिठ्ठीमुळे उलगडला प्रकारगोवा पोलिसांना सिद्धी परब हिच्या खोलीत चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत आपले एका युवकावर प्रेम असून, घरच्यांकडून प्रेमविवाहाला विरोध होईल. त्यामुळेच आपण आपली जीवनयात्रा संपवीत असल्याचे तिने नमूद केले. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या काकाला आत्महत्या करीत असल्याचा संदेश मोबाईलवरून पाठविला होता. त्यामुळे पे्रमप्रकरणातूनच सिद्धीने आपले जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी व्यक्त केला.