शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांच्या सामूहिक निर्णयातून दोणवलीत आले ‘महिला राज’

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

अगदी दुर्गम भागाचा विकासही केवढ्या वेगाने करू शकतात, हे दाखवून दिलंय चिपळूण तालुक्यातील दोणवली गावच्या महिलाराजने.

शोभना कांबळे - रत्नागिरी --राजकारणात महिलांना काय कळते, असा शिक्का पुरूषवर्गाकडून बिनदिक्कत मारला जातो. या समजापोटीच आज राजकारणात महिला आल्या तरी त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जाते. पण, महिला राजकारणात सक्रिय झाल्या तर त्या अगदी दुर्गम भागाचा विकासही केवढ्या वेगाने करू शकतात, हे दाखवून दिलंय चिपळूण तालुक्यातील दोणवली गावच्या महिलाराजने. पुरूषवर्गाला आव्हान देत बिनविरोध निवडणुकीची प्रथा मोडीत काढत चक्क स्वतंत्र पॅनल लढवून निवडून आणले आणि आता तर गावानेच महिलाराज आणायचे, असा निर्धार करून महिलांची ग्रामपंचायत स्थापन केलीय. दोणवली गावची महिला ग्रामपंचायत केवळ जिल्ह्यातील नव्हे; तर महाराष्ट्रातील पहिली ठरावी.दोणवली चिपळूणपासून २५ ते २७ किलोमीटर अंतरावरील खाडीकिनारी वसलेलं एक छोटसं गाव. वस्ती जेमतेम १२००च्या आसपास. दिवसातून एस. टी.च्या जेमतेम ४ गाड्या जातात. पण, याच गावात जेव्हा आज शाळा हायस्कूल नव्हते, तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत दहावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या दोणवली गावच्या सामाजिक कार्यकर्त्या सुशिला पवार यांना घटना दुरूस्तीने मिळालेल्या आरक्षणाने १९९४ साली पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतीचे सदस्यत्व मिळवून दिले. ही निवड बिनविरोध झाली होती. वयाच्या २२व्या वर्षापासून चिपळूण येथील ‘संवाद’ संस्थेची पूर्णवेळ सक्रिय कार्यकर्ती असलेल्या सुशिला पवार यांनी आपल्या अनुभवाचा लाभ उठविला. या काळात त्यांनी १५ आॅगस्ट व २६ जानेवारीला महिलांची सर्वाधिक उपस्थिती, महिलांच्या हस्ते झेंडावंदन, ग्रामसभेत महिलांचा वाढता सहभाग, तहकूब सभांची परंपरा खंडित केली. बचत गटांनाही या ग्रामसभांचे निमंत्रण देण्याची नवीन पद्धत रूढ केली. परिणामी महिलांची उपस्थिती वाढली. यातून महिलांचे संघटन आणि त्यांच्यातील राजकीय इच्छाशक्ती आपोआप वाढू लागली. मात्र, त्यांच्या या सकारात्मक राजकारणाचा त्रास काही व्यक्तिंना होऊ लागला. त्याना बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया खंडित करायची नव्हती. त्यामुळे ठराविक व्यक्तिंनी ‘तू येत्या निवडणुकीच्या भानगडीत पडू नकोस’ अशी जवळजवळ धमकीच दिली. यावेळी त्या स्वत:हून निवडणुकीपासून अलिप्त राहिल्या. मात्र, २००४ साली त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने बिनविरोध निवडणुकीला आव्हान देत स्वतंत्र पॅनलच उभे केले. यावेळी पुरूषवर्गाच्या दबावाचा त्रास सहन करावा लागला. मात्र, त्या मागे बधल्या नाहीत. लोकशाहीचा विजय झाला आणि हे पॅनल निवडून आलं. विशेष म्हणजे त्यावर्षीचे पद महिलांसाठी आरक्षित होते. सरपंचपदाची माळ साहजिकच इतिहास घडविणाऱ्या सुशिला पवार यांच्या गळ्यात पडली. पुरूष सदस्यांनीही त्यांच्या या पदाला मोठ्या मनाने मान्यता दिली. पाच वर्षांच्या कालावधीत सुशिला पवार यांनी सरपंच या नात्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ‘घर दोघांच्या नावाचे’ हा महत्त्वपूर्ण निर्णय याचवेळी राबविला. जादूटोणाविरोधी कायदा, महिला हिंसाविरोधी कायदा, लिंग निदानविरोधी कायद्याविषयी जागृती आदींबरोबरच गावविकासात स्वच्छ कारभाराचा ठसा उमटवला. महिलावर्ग गावचा विकास एवढ्या वेगाने करू शकतो, हे गावकऱ्यांनाही कळून चुकले. जुलै २०१४मध्ये गावानेच सामूहिक प्रक्रियेने दोणवली गावात महिलाराज आणण्याचा निर्णय घेतला. ६ जुलै २०१४ रोजी दोणवली गावची महिलांची ग्रामपंचायत अस्तित्त्वात आली आणि दुसऱ्यांदा सरपंचपदाची माळ सुशिला पवार यांच्या गळ्यात पडली. आज या ग्रामपंचायतीत पाच सदस्या आहेत. दोघींची कागदपत्र अपूर्ण असल्याने त्यांची निवड झालेली नाही. आता त्यांनीही कागदपत्रांची पूर्तता केली असल्याने त्यांची सदस्य म्हणून निवड होणार आहे. सुशिला पवार यांची दोन गंभीर आॅपरेशन्स झाली आहेत. मधुमेहासारखा आजार असला तरी कार्यशैली कौतुकास्पद आहे. या सर्व महिलांना संवाद संस्थेकडून कामाचे बाळकडू मिळाले आहे.1१९९४ साली पाच वर्षांसाठी ग्रामपंचायतीचे सदस्यत्व.2वयाच्या २२व्या वर्षापासून ‘संवाद’ संस्थेची पूर्णवेळ सक्रिय कार्यकर्ती.3१५ आॅगस्ट व २६ जानेवारीला महिलांची सर्वाधिक उपस्थिती, महिलांच्या हस्ते झेंडावंदन, ग्रामसभेत महिलांचा वाढता सहभाग, तहकूब सभांची परंपरा खंडित. 4२००४ साली त्यांनी मैत्रिणींच्या सहाय्याने बिनविरोध निवडणुकीला दिले आव्हान.5२०१४ मध्ये गावानेच सामूहिक प्रक्रियेने दोणवली गावात महिलाराज आणण्याचा घेतला निर्णय.6६ जुलै २०१४ रोजी दोणवली गावची महिलांची ग्रामपंचायत अस्तित्त्वात.