शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला बसणार ५ कोटींचा फटका

By admin | Updated: March 24, 2016 23:39 IST

पर्ससीन बंदी : बर्फ कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर

रत्नागिरी : शहरातील पर्ससीन नेट मासेमारीवरील बंदीमुळे जिल्ह्यातील बर्फ कारखानेही बंद होण्याच्या स्थितीत आहेत. या बंदीचे दूरगामी परिणाम होणार असून, महावितरणला सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचा फटका यामुळे बसणार आहे. पर्ससीन नेट बंदीमुळे मच्छीमार रडकुंडीला आले आहेत. महिना उलटला तरी पर्ससीन नेटने मासेमारी करण्यावरील बंदी उठवण्याबाबत शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायासाठी पर्ससीन नेटधारकांवर लाखो रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी बँका, व्यापारी आणि खासगी वित्तीय संस्थांकडूनही कर्जाची उचल केली आहे. बंदी लादल्यानंतर सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप मासेमारी सुरु न झाल्याने खलाशांचा खर्च कसा भागवावा, कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. पर्ससीन नेटधारकांनाही यंदाच्या मोसमामध्ये मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने बँकांचे हप्ते थकले आहेत. ते भरण्यासाठी बँकांनी तगादा लावला आहे. त्यामुळे मच्छीमारांना डोक्यावर कर्जाचं ओझं घेऊन जगणे मुश्किल झाले आहे. मासेमारीवर अनेक जोडधंदे व अन्य व्यावसायिक अवलंंबून आहेत. मासे टिकवण्यासाठी महत्वाचा घटक ठरणाऱ्या बर्फ कारखान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न या बंदीमुळे निर्माण झाला आहे. पर्ससीन नेटने मासेमारी करणाऱ्या नौका आणि मच्छी व्यावसायिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बर्फ कारखान्यातून बर्फाची उचल करण्यात येत होती. रत्नागिरी परिसरामध्ये सुमारे २५ बर्फ कारखाने आहेत. या कारखान्यांमधून हजारो टन बर्फाची उचल होेत होती. या बर्फ कारखान्यांमधून महावितरणला महिन्याला ५० लाख रुपयांचे बिल मिळते. त्यामुळे वर्षाला कारखान्यांमधून बिलापोटी महावितरणला ५ कोटी रुपये मिळतात. त्यामुळे अनेक व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. (शहर वार्ताहर)1उद्योग धोक्यात : विजेचे बिल भरणे न परवडण्यासारखेबर्फ कारखाने बंद झाल्यास महावितरणला वर्षाकाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. पर्ससीन नेटवरील बंदीचे दूरगामी परिणाम दिसू लागले आहेत. बर्फ कारखाने बंद पडल्यास महावितरणचे मोठे नुकसान होणार आहे. मच्छीमारी मंदावल्याने बर्फ कारखाने धोक्यात आले आहेत.2सध्या पर्ससीन नेटने मासेमारीला बंदी असल्याचे बर्फाची उचल अत्यल्प झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांना विजेचे बिल भरणे न परवडणारे आहे. पर्ससीन नेटवरील बंदीमुळे बर्फ कारखान्यांचा धंदा मंदावला असून, ते बंद होण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे हा व्यवसायही धोक्यात आला आहे.उद्योग संकटातबर्फ कारखान्याला जास्त वीज लागते, त्यामानाने बर्फाला मागणी खूपच कमी होणार आहे. त्यामुळे हे कारखाने सुरु ठेवणेही उद्योजकांच्या आवाक्यापलिकडे जाणार असून, त्यामुळे हा उद्योग संकटात सापडला आहे.