शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
6
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
9
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
10
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
13
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
14
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
15
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
16
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
17
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
18
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
19
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
20
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीची पकड घट्ट, घराणेशाही तरीही..

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 14, 2024 12:38 IST

तिन्ही मतदारसंघांत जोरदार लढत, शिवसेनेच्या दोन गटात जोरदार रस्सीखेच

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या भरघोस यशानंतर दक्षिण कोकणातील टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर महायुतीची पकड घट्ट असल्याचे सिद्ध करण्यासाठी महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये तीन पैकी दोन जागा उद्धवसेनेकडे होत्या. आता शिवसेना पक्षफुटीनंतर तीन पैकी दोन जागा जिंकून शिंदेसेना वर्चस्वासाठी प्रयत्नशील आहे. भाजपाने आपली हक्काची एक जागा निवडून आणण्यावर समाधान मानले आहे. महाविकास आघाडीसाठी जिल्ह्यातील निवडणुकीचा पेपर कठीण असला तरी उद्धवसेनेने तिन्ही जागांवर उमेदवार देऊन शिंदेसेना आणि भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • महायुतीमध्ये राणे यांच्या घरात तीन पैकी दोन तिकीट मिळाल्यामुळे घराणेशाहीचा आरोप होत आहे.
  • महायुतीमध्ये सावंतवाडीत बंडखोरी झाल्याने त्याचा फटका कोणाला बसतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
  • मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, हा कळीचा मुद्दा आहे.
  • परप्रांतीय मच्छिमारांकडून सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील हद्दीत घुसखोरी सुरू असून माशांची लूट केली जात आहे.
  • काजूला हमीभाव मिळावा या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असेविधानसभा मतदारसंघ - मतदान - विद्यमान आमदार - पक्ष - मिळालेली मतेकणकवली - ६६% - नितेश राणे - भाजपा - ८४,५०४कुडाळ - ६३% - वैभव नाईक - शिवसेना - ६९,१६८सावंतवाडी - ६४% - दीपक केसरकर - शिवसेना - ६९,७८४

नीलेश राणे शिंदेसेनेतमहायुतीमध्ये कुडाळ मतदारसंघ शिंदेसेनेच्या वाट्याला गेल्याने याठिकाणी माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आहे.

मतदान २०१९ मध्ये६७% मतदान विधानसभेसाठी होते२३ उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशीब आजमावले.  १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kankavli-acकणकवलीkudal-acकुडाळMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024