शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला टाळे

By admin | Updated: August 29, 2016 00:40 IST

नीतेश राणे : अरुणा प्रकल्पस्थळी बैठक; प्रकल्पग्रस्तांचा मोबदला, पुनर्वसन रखडले

वैभववाडी : अरुणा प्रकल्पाचे काम ७० टक्के झाले तरी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा पत्ताच नाही. त्यामुळे नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला आणि पुनर्वसनाचे काम ७० टक्के पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रकल्पस्थळी पानही हलणार नाही, असा इशारा देत आमदार नीतेश राणे यांनी अरुणा प्रकल्पाचा मक्तेदार ‘महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेक्ट’च्या कार्यालयाला शनिवारी रात्री टाळे ठोकले. हेत-आखवणे दरम्यान सुरु असलेल्या अरुणा पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांची प्रकल्पस्थळी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सकपाळ, उपअभियंता एस. व्ही. राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, सभापती शुभांगी पवार, जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम पवार, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, वैशाली रावराणे, उपनगराध्यक्ष संजय चव्हाण, अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष रंगनाथ नागप, सचिव डॉ. जगन्नाथ जामदार आदी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने भूमिका मांडण्यासाठी उठलेले संघर्ष कृती समितीचे सचिव डॉ. जामदार यांना खाली बसवून आमदार राणे यांनी प्रकल्पाचे अधिकारी व भूसंपादनचे कर्मचारी तसेच ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या प्रतिनिधींना फैलावर घेतले. धरणाचे काम ७० टक्के झाले. मात्र, प्रकल्पग्रस्तांना मोबदला, पुनर्वसनाचे काम त्या प्रमाणात का होऊ शकले नाही? अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे, असा आरोप आमदार राणे यांनी केला.यावेळी आखवणेतील १६२ कुटुंबांनी हेत गावात पुनर्वसनाची मागणी केली होती. मात्र, ती मागणी फेटाळून त्यांचे पुनर्वसन मांगवली गावठाणात करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मांगवली गावठाणानजीक मोठे डोंगर असल्याने ‘माळीण’सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करुन प्रकल्पग्रस्तांच्या इच्छेनुसार पुनर्वसन करण्याची सूचना आमदार राणे यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावेळी नव्या भूसंपादन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याचा प्रस्ताव पुढील चार-पाच दिवसात पाठविला जाईल, असे भूसंपादनच्या कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. धरणाच्या तुलनेत पुनर्वसनाचे काम मागे पडल्याने आमदार राणे यांनी भूसंपादन, पुनर्वसन खात्यांबरोबरच मक्तेदार ‘महालक्ष्मी इन्फ्रा’ला जबाबदार धरले. त्यामुळे पुनर्वसनाचे काम धरणाइतके होत नाही. तोपर्यंत प्रकल्पस्थळी पानही हलणार नाही. अगदी मक्तेदाराचे कार्यालयीन कामकाजही बंद राहील, असा इशारा देत आमदार नीतेश राणे यांनी ‘महालक्ष्मी इन्फ्रा’च्या कार्यालयाला टाळे ठोकले. अधिकाऱ्यांची बैठकीकडे पाठ प्रकल्पग्रस्ताच्या बैठकीला पुनर्वसन, भूसंपादन अधिकारी हजर राहणे आवश्यक असताना कर्मचारी प्रतिनिधी पाठवून दोन्ही अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, भूसंपादनासंबंधीचे मुद्दे अनुत्तरीत राहिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोबदला व पुनर्वसन रखडले असताना आमदार नीतेश राणे यांनी ‘महालक्ष्मी इन्फ्रा’ च्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यामुळे यातून नेमके कधी आणि काय निष्पन्न होणार? याची प्रकल्पग्रस्तांना उत्सुकता आहे.