शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक की साळवी; चर्चेत गुऱ्हाळ सुरूच

By admin | Updated: March 20, 2017 23:51 IST

जिल्हा परिषद अध्यक्ष : आज निवडणूक, संभ्रम कायम

रत्नागिरी : स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीबाबत शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण असल्याने अध्यक्ष पदाची निवडणूक काही तासांवर ठेपली तरी अंतिम नाव निश्चित झाले नाही. संगमेश्वर तालुक्यातील रचना महाडिक आणि लांजातील स्वरुपा साळवी यांच्या नावांमधील शर्यत सोमवारी रात्री उशिरापर्यंत कायम होती. उपाध्यक्षपदासाठी मात्र बाळकृष्ण जाधव यांच्या नावावर रात्री उशिराने शिक्कामोर्तब झाले.एकूण ५५पैकी ३९ सदस्य शिवसेनेने निवडून आणून जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. यावेळी शिवसेनेने भाजपला लांब ठेवून एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापतीपदे शिवसेनेकडेच राहणार आहेत. पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपद सर्वसाधारण महिला सदस्यासाठी आरक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या रचना महाडिक आणि स्वरुपा साळवी यांची नावे गेले काही दिवस चर्चेत आहेत.अध्यक्षपदासाठी संगमेश्वर आणि लांजा यापैकी कोणत्या तालुक्याला संधी मिळते, याची आज दिवसभर चर्चा सुरु होती. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आणि लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी अध्यक्षपदासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. रचना महाडिक २००९ - २०११ या कालावधीत अध्यक्ष होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनावर उत्तम पकड निर्माण केली होती. स्वरुपा साळवी यांनीही त्याच कालावधीत महिला व बालकल्याण समिती सभापतीपद सांभाळले होते. आता या दोघींच्या विशेषत: त्यांच्या पाठीराख्या नेत्यांच्या पक्षातील वजनाची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे़जिल्हा परिषदेतील गेल्या महिन्यातील स्थिती पाहता शिवसेना-भाजप यांच्यातील वाद तसेच अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांचे आजारपण यामुळे सत्ता असतानाही प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे एकंदरीत स्थितीवरुन पुढे येत आहे. त्यासाठी प्रशासनावर वचक निर्माण करण्यासाठी महाडिक की, साळवी यापैकी जास्त प्रभावी कोण ठरु शकते, याचाही विचार पक्षस्तरावर सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला एका डॅशिंग अध्यक्षाची आवश्यकता असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत शिवसेनेच्या सदस्यांची शासकीय विश्रामगृहात सुरु होती़ त्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात आले़ मात्र, साळवी यांच्या नावाचीही चर्चा होती़ शेवटी महाडीक कि साळवी हे मातोश्रीवर ठरवले जाणार आहे.उपाध्यक्षपदासाठीही मंगळवारी निवडणूक होत असून, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे बंधू चंद्रकांत कदम, चिपळूणचे बाळकृष्ण जाधव, मंडणगडचे संतोष गोवळे यांचीही नावे चर्चेत होती़ मात्र, उपाध्यक्ष पदासाठी जाधव यांचे नाव रात्री उशिरा निश्चित झाल्याचे समजते़ (शहर वार्ताहर)