शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

कुणकेरीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या

By admin | Updated: October 21, 2016 01:11 IST

प्रेमाच्या विरोधामुळे केले कृत्य : एकाच दोरीने संपविला जीव; घटनेने सावंतवाडीत हळहळ

सावंतवाडी : कुणकेरी वनविभाग कार्यालयाच्या मागील बाजूच्या सुमारे ५०० मीटर परिसरातील जंगलात प्रेमीयुगुलाने एकाच दोरीच्या सहायाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेमप्रकरणासह लग्नाला विरोध झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘एक दुजे के लिए’ जगू पाहणाऱ्या या युगुलाने चित्रपटातील दृश्याप्रमाणे जीवन संपविले आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. कोलगाव-पांडवनगरी येथील वैभवी बाबूराव चव्हाण (वय २१) व सावंतवाडी माठेवाडा येथील नागेश गोसावी (१९) अशी या दोघांची नावे आहेत. घटनास्थळी सापडलेल्या कीटकनाशक व पाण्याच्या बाटलीमुळे आत्महत्येपूर्वी दोघांनी कीटकनाशक प्राशन केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. गेले आठ दिवस वैभवी चव्हाण घरातून बेपत्ता असल्याची तक्रार वडील बाबूराव चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटविल्याने अखेर या प्रकाराचा उलगडा झाला. यावेळी त्यांनी मुलीचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या पोलिस निरीक्षक शंकर पाटील व अन्य सहकाऱ्यांनी झाडावर असलेले मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदन करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेले. कुणकेरी-कोलगाव सीमेवर असलेल्या जंगलात गस्त घालत असताना वनविभागाचे कर्मचारी शांताराम गावडे यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोन कुजलेले मृतदेह दिसून आले, त्यांनी याबाबतची माहिती माजगाव वनपाल चंद्रसेन धुरी यांना पोलिसांनी दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहामुळे दुर्गंधी पसरली होती. सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अरुण जाधव व त्यांचे सहकारी राजेंद्र गवस, डुमिंग डिसोझा, दीपाली सावंत, आदी दाखल झाले. घटनास्थळावर त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांना कीटकनाशक असलेले पाकीट, दोन पाण्याच्या बाटल्या आणी एक मोडलेल्या सीमकार्डचा भाग अशा वस्तू आढळून आल्या. मात्र, या व्यतिरिक्त अन्य काही तेथे नसल्याने मृतदेहांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते.यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, पंचायत समिती सदस्य महेश सारंग, मायकल डीसोझा, मेघश्याम काजरेकर, संदीप राणे, संदीप परब, पप्पू सावंत, प्रमोद गावडे, पप्पू ठीकार, अनिल नाईक, बाबा राऊळ आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला. त्या ठिकाणी केलेल्या तपासणीत युवकाच्या पॅन्टमध्ये मोबाईल आढळून आला. नागेश आणि वैभवी या दोघांची सहा महिन्यांपासून ओळख होती. नागेश हा बसस्थानक परिसरातील एका वडापाव सेंटरवर काम करीत होता. त्या ठिकाणी त्याची वैभवी हिच्याशी ओळख झाली. वैभवी माडखोल येथील कृषी विद्यापिठात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. त्यामुळे दोघांची नेहमी भेट होत असे. त्यातून हे प्रेमप्रकरण सुरू झाले. दरम्यान, दोघेही अल्पवयीन असल्यामुळे त्यांना समज देण्याची मागणी चव्हाण यांच्याकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र, बुधवार १२ आॅक्टोबर रोजी सकाळी कॉलेजमध्ये जाते असे सांगून वैभवी गेली ती घरी परतली नसल्यामुळे चव्हाण यांनी पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आठ दिवसानंतर गुरूवारी दोघांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर) ‘जीवन की डोर, एकही ओर’ या युगुलाला अगोदर समजाविण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोलिसांना सांगण्यात आले होते. या विरोधातूनच त्यांनी एकमेकांसाठी एकाच दोराने जीवन संपविले. वजन तागडीप्रमाणे समसमान अंतरावर दोघांचेही मृतदेह लटकत होते. चव्हाण कुटुंबीयांना दुसरा हादरा यातील मृत वैभवी हिच्या आजी-आजोबांनी तीन वर्षांपूर्वी आजारपणाला कंटाळून अशाचप्रकारे घराच्या पडवीत गळफास घेऊन एकाच वेळी जीवन संपविले होते. असाच काहीसा प्रकार पुन्हा घडल्याने चव्हाण कुटुंबीयांना पुन्हा धक्का बसला आहे. तर नागेश याच्या आईचे दुर्धर आधाराने निधन झाले होत. तो एकटाच माठेवाडा भागात राहत होता. त्याला एक बहीण असून, ती निवारा केंद्रात आहे.