शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लोटेत अपघात, दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: October 30, 2016 23:06 IST

ग्रामपंचायत सदस्या गंभीर जखमी

आवाशी : कामे आटोपून घरी परतणाऱ्या पती-पत्नीच्या दुचाकीला अपघात होऊन प्रशांत हुमणे (वय ३२, रा. लोटे) हा तरूण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावर लोटे येथील गुणदे फाट्यावर ट्रक मागे घेतला जात असताना हा अपघात झाला. प्रशांत यांची पत्नी लोटे ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता हुमणे या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. मुंबईहून एक ट्रक (जीजे-१/सीएक्स ३0५८) लोटे येथील कन्साई नेरॉलॅक कंपनीकडे जात होता. गुणदे फाट्यावर आपण रस्ता चुकल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. गुणदे फाट्यावरून आतील रस्त्यावर जाण्यासाठी त्याने ट्रक मागे घेण्यास सुरूवात केली. त्याचवेळी मागे प्रशांत हुमणे यांची दुचाकी होती. ते पीरलोटेकडे जात होते. मागे येणाऱ्या ट्रकखाली त्यांची दुचाकी सापडली आणि त्यात ते जागीच ठार झाले. प्रशांत यांच्यासोबत त्यांची पत्नी प्राजक्ता (२८) याही होत्या. त्या लोटे ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. त्यांना तत्काळ लोटेतील परशुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना लगेचच एका खासगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. (वार्ताहर)