शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकडे व्यापारीदृष्टीने पहा

By admin | Updated: April 30, 2015 00:27 IST

नरेंद्र वाकडे : कणकवलीत आंबा महोत्सवास प्रारंभ

कणकवली : राष्ट्रीय फलोत्पादन योजनेवर आतापर्यंत ९० लाखांपेक्षा जास्त खर्च होत नव्हता. आता ६ कोटीपर्यंत खर्च होत आहे. शेतीकडे व्यापारी दृष्टीकोनातून पहा. खपेल ते पिकवा. मग शेती आईसारखे पालनपोषण करेल. शेतीला कुक्कुटपालनासारख्या दुय्यम व्यवसायाची जोड द्या. आंबा पिकाचे मूल्यसंवर्धन केल्यास जास्त फायदा होईल, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र वाकडे यांनी केले. सोमवारी सायंकाळी एकता प्रतिष्ठानतर्फे आयोजित आंबा महोत्सवाचा वाकडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. एकता प्रतिष्ठानच्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र वाकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू, एकता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी दाभोळकर, सचिव विशाखा परब, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, अ‍ॅड. हर्षद गावडे, डॉ. विद्याधर तायशेटे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील जमिन विविध घटकांनी परिपूर्ण असल्याने उत्कृष्ट आहे. व्यापार, नोकरीपेक्षा शेतीला भविष्यात सिंधुदुर्गात चांगले दिवस येणार असून त्यादृष्टीने युवकांनी प्रयत्न करावेत, असे वाकडे पुढे म्हणाले. प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी आंबा पिकाला जगभरात मागणी आहे. उत्पादकांनी त्याचा दर्जा लक्षात घ्यावा. काही तालुक्यांनी उत्पादनाची तर महामार्गालगत मार्केटिंगची जबाबदारी घ्यावी. तहसीलदार समीर घारे म्हणाले की, मार्केटिंगमुळे कुठल्याही उत्पादनाचे महत्त्व वाढते. आंबा महोत्सव जिल्ह्याबाहेर नागपूर, औरंगाबाद अशा ठिकाण व्हावेत. जिल्ह्यातील ८० टक्के क्षेत्र विनावापर आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जमिन लागवडीखाली आणावी. प्रक्रिया उद्योग विकसीत होण्यास अद्याप खूप वाव आहे. काही देशांत नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, नैसर्गिक समृद्धी असलेल्या सिंधुदुर्गात रानटी फळे आणि भाज्यांपासूनही फायदा मिळवला जाऊ शकतो, हे आपले सुदैव आहे. युवकांनी याचा विचार करावा, असे नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत म्हणाल्या. अ‍ॅड. उमेश सावंत यांनी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. अ‍ॅड. राजेंद्र रावराणे, डॉ. विद्याधर तायशेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)