शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

निवडणुकीसाठी तत्पर रहा

By admin | Updated: October 1, 2014 00:48 IST

कमल श्रीवास्तव : जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी ही काटेकोर आहे. आचारसंहिता अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील निवडणुका मुक्त, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्पर राहून एकजुटीने काम करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ. कमल श्रीवास्तव यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक डॉ. कमल श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सनिल रेडकर, निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी अरविंद मोटाघरे, स्वीपचे नोडल अधिकारी अशोक साबळे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी बी. बी. हेगडे आदी उपस्थित होते. डॉ. श्रीवास्तव म्हणाले, निवडणुकीसाठी प्रशासनाने केलेली तयारी अतिशय चोख आहे. स्थानिक प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी. निवडणूक प्रक्रिया पार पाडताना येणाऱ्या अडचणी अथवा मार्गदर्शनासाठी सर्व निवडणूक निरीक्षक आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रशासन उपलब्ध मनुष्यबळाचा वापर व निवडणूक कामाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडेल अशी मला आशा आहे, असे मत डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. ई. रविंद्रन म्हणाले, निवडणुकांकरिता पुरेसा कर्मचारी वर्ग मतदारसंघनिहाय उपलब्ध आहे. झोन व सेक्टर अधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाच्या पोस्ट २००६ मेकच्या मशिन्स वापरण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार मशिन्सची तपासणी करून राजकीय पक्षांनाही याबाबतीत सर्व माहिती देऊन काटेकोरपणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात करण्यात आलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही, स्वीप कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम, मतदान यंत्राची ओळख, रॅली या उपक्रमांची ई. रविंद्रन यांनी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे निवडणूक निरीक्षक यांच्यापुढे सादर केली. (प्रतिनिधी)