शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘त्यांच्यावरील’ कारवाईकडे लक्ष

By admin | Updated: December 9, 2014 23:19 IST

बंधाऱ्यांचे उद्दिष्ट : कृषी विभाग, सामाजिक वनीकरणचे दुर्लक्ष

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आतापर्यंत ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी २४९६ बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी विभाग व सामाजिक वनीकरण या दोन विभागांना त्यातीलच १७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट असून त्यांनी अद्यापपर्यंत एकही बंधारा पूर्ण केला नसल्याची बाब प्रशासनाच्या अहवालातून उघड झाली आहे. त्यामुळे या दोन विभागांवर प्रशासन कोणती कारवाई करते यावर लक्ष लागून राहिले आहे.साधारणत: मे अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरूवात होते. त्यातच यावर्षी पाऊसही कमी झाल्याने व भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे अखेर पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षीही कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे ठरविले. त्यानुसार ६७०० बंधाऱ्यांचे उद्दिष्टही प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजाराचे टार्गेट तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले. मात्र, तालुक्यातून ५ हजार बंधाऱ्यापैकी जवळजवळ ५० टक्के काम पूर्ण झाले असून २४९६ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. हे काम समाधानकारक आहे. मात्र, राज्य कृषी विभाग व सामाजिक वनीकरण विभाग या दोघांनी अद्यापही भोपळा फोडलेला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाली आहे. (प्रतिनिधी)लघुपाटबंधारे विभागाकडून पत्रकृषी व सामाजिक वनीकरण विभागाने अद्याप एकही बंधारा न घातल्याने लघुपाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून लक्ष वेधण्यात येणार आहे, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.कृषी विभाग निद्रीस्तचया ना त्या कारणाने नेहमीच टार्गेटवर असणारा राज्य शासनाचा कृषी विभाग बंधाऱ्याच्या बाबतीतही उदासीनच दिसून येत आहे. बंधाऱ्याच्या बाबतीत अद्यापही खाते न उघडल्याने ‘गोत्यात’ येणार आहे.प्रशासन कारवाई करणार?अद्यापही कृषी व सामाजिक वनीकरण विभागांनी कच्चे व वनराई बंधारे न बांधल्याने या विभागावर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन विभागांना हे बंधाऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. गतवर्षीही या दोन्ही विभागाकडून उदासीनताच दाखविण्यात आली होती. गतवर्षी कृषी विभागाने १५०० बंधाऱ्यांपैकी ४२१ तर सामाजिक वनीकरणने २०० पैकी ८४ बंधारे बांधले होते.तालुकाउद्दिष्टकच्चेवनराईएकूणटक्केवारीबंधारेबंधारेकणकवली८५०३२११९९५२०६१.१८कुडाळ८५०१६५१५४३१९३९.८८दोडामार्ग३००१५५५७०२३.३३वेंगुर्ला४००७०१७८२४४६२.००मालवण८००२३३६४२९७३७.१३देवगड७००६४१५८२२२३१.७१सावंतवाडी८५०४२६२५६६७७८.४७वैभववाडी३००७५७८१५३५१.००एकूण५०००९८५१५११२४९६४९.९२राज्य कृषी व सामाजिक वनीकरण विभागविभागउद्दिष्टसाध्यराज्यशासन कृषी १५०० ०सामाजिक वनीकरण२०० ०