शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in shindhudurg - दीर्घ सुटीमुळे चाकरमान्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 16:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदीर्घ सुटीमुळे चाकरमान्यांची संख्या वाढलीग्रामस्थांनी सहकार्य करावे : महेश जाधव

आंबोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत सुटी असल्याने कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या मुंबई, पुणे आदी भागातून व्यक्तींचे गावी येणे वाढले आहे. तर परजिल्ह्यातून तसेच राज्यातून आलेल्या व्यक्तींवर शनिवारपासून आंबोली आरोग्य केंद्राकडून होम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

होम क्वारंटाईन लावलेल्या व्यक्तींनी ३१ मार्चपर्यंत घरातून बाहेर न पडण्याचे आवाहनही करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. महेश जाधव यांनी दिली.आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील व्यक्ती पुणे व मुंबई येथून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ साधा ताप व सर्दीलाही तपासणीसाठी आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत. मात्र, आंबोली आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत. तर आंबोली आरोग्य केंद्रांतर्गत अनेक गावे असून अद्याप प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचारी जनजागृती तसेच सर्व्हेला पोहोचलेले नाहीत.

आंबोलीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी येथील आरोग्य केंद्रात अनुभवी एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नाहीत. तपासणीसाठी लॅबही नसल्याने अनेक गैरसोयी भविष्यात होऊ शकतात. त्यामुळे आंबोली परिसराचे महत्त्व ओळखून येथे कोरोना साथ असेपर्यंत अनुभवी व जबाबदार एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.मुंबई, पुणे व आदी परिसरातून आलेल्या व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प दिसल्यास तत्काळ आंबोली ग्रामपंचायत किंवा आरोग्य केंद्रात माहिती द्यावी. तसेच गावातील व्यक्तींशी थेट संपर्क टाळावा, असे आवाहन डॉ.महेश जाधव व आंबोली टुरिझमकडून करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी सहकार्य करावे : महेश जाधवकोरोना संक्रमित भागातून आलेल्या व्यक्तींची नोंद आंबोली आरोग्य केंद्रात केली आहे. तर अद्याप नोंद करण्याचे काम चालू असून बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तींवर होम क्वारंटाईन स्टॅम्प लावून योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. तसेच बाहेरून आलेल्या व्यक्तींनी व गावातील ग्रामस्थांनी कोरोनाबद्दल शासनाकडून देण्यात आलेली माहितीद्वारे स्वत:ची काळजी घ्यावी.

काही शंका वाटल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. साथ या परिसरात पसरू नये यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरोग्य सेवा देण्यासाठी तयार आहोत, असे आवाहन डॉ.महेश जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग