शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मळगावात लोकमाहिती अभियान

By admin | Updated: December 24, 2015 00:54 IST

बालाजी प्रभूगावकर यांची माहिती : २८ ते ३0 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचविणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालय पणजी यांच्यामार्फत सावंतवाडी मळगाव येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रसूचना कार्यालय पणजीचे सहाय्यक संचालक बालाजी प्रभूगांवकर यांनी दिली.तीन दिवसीय लोकमाहिती अभियानाची माहिती देण्यासाठी बुधवारी येथील पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समरजीत ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, सहाय्यक माहिती अधिकारी संध्या गरवारे अन्य उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमात गीत व नाटक प्रभाग, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने मनोरंजनातून प्रबोधन केले जाणार आहे. जयहिंद लोक नाट्यसंस्था व शाहिरी पोवाडा कलामंच सांगली हे बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, सार्वजनिक आरोग्य या विषयावर सादरीकरण करणार आहेत.केंद्रशासनाकडून ज्या काही विविध योजना राबविल्या जात आहेत त्या योजनांची लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रतिनिधी देण्याचे काम यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया यांच्याकडून पंतप्रधान जनधन योजना, मुद्रा योजना, राष्ट्रीय ग्रामीण योजना, अटल पेन्शन योजना आदी योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी तसेच महसूल प्रशासनाच्यावतीने आधारकार्ड काढण्याची योजनाही आखण्यात आली आहे. ज्या नागरिकांना अद्याप आधारकार्ड मिळालेले नाही त्यांना ताबडतोब आधारकार्ड मिळवून देण्याची व्यवस्था या अभियानादरम्यान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)प्रभूगावकर : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनबालाजी प्रभुगांवकर म्हणाले, २८, २९, ३० डिसेंबर २०१५ रोजी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत आलेल्या पत्र सूचनेनुसार लोकमाहिती अभियानाचे आयोजन सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे करण्यात आले. २८ डिसेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह आदी उपस्थित राहणार आहेत.