शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

Lok Sabha Election 2019 योग्य जागी नेम धरून बाण सोडा!  -दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 19:14 IST

अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल. 

ठळक मुद्देएका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला

कणकवली : अनिष्ट वृत्तीच्या विरोधात लढण्याचा कोकणी बाणा असून लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा महायुती तो निश्चितपणे दाखवेल.  विकासाबाबतीत विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी केवळ स्वत:चा विकास करणाºया विरोधकांना जिल्ह्यातील जनता कोणत्याही परिस्थितीत साथ देणार नाही. योग्यजागी नेम धरून बाण सोडा. एका बाणात तीन लक्ष्यभेद होतील आणि सिंधुदुर्गला लागलेले ग्रहण दूर होईल, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना लगावला.

कणकवली तालुक्यातील वागदे येथे शिवसेना-भाजपा-रिपाई-रासप  महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित प्रचारसभेत पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी  खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हाध्यक्षा निलम सावंत-पालव, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, ओसरगाव सरपंच प्रमोद कावले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, विधानसभा संपर्क समन्वयक सचिन सावंत, महिला तालुकाध्यक्षा प्रतीक्षा साटम, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर, रुपेश आमडोसकर, नगरसेवक सुशांत नाईक, अ‍ॅड. हर्षद गावडे, उमेश घाडीगांवकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले,  खासदार विनायक राऊत यांनी स्वत:चे राजवाडे बांधले नाहीत. मात्र, जिल्ह्यातील राजकारण्यांनी मुंबईत सात मजली घरे उभारली. हा पैसा आला कुठून याचा विचार होणे आवश्यक आहे. गडचिरोलीनंतर संवेदनशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख होती. मात्र ही ओळख मागील पाच वर्षांत पुसली गेली आहे.  विकासाबाबत राणे यांनी आमच्याशी विनाकारण स्पर्धा करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.स्वाभिमानवाल्यांचा खोडसाळपणायावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, शिवसेना-भाजपा युती अभेद्य आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर आता स्वत:चा पक्ष स्थापन करणाºयांना येथील जनता किंमत देणार नाही. सेना-भाजपा महायुतीत संभ्रम निर्माण करण्यासाठी स्वाभिमानवाले खोडसाळपणा करीत आहेत. भाजपा आतून स्वाभिमानसोबत असल्याच्या थापा मारून मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र सेना-भाजपा युतीत गद्दारी होणार नाही. या निवडणुकीत मतदारच राणेंना अद्दल घडवतील. अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना आणि विकास हे समीकरण जुळले आहे. शिवसेना-भाजपा युती म्हणजेच विजय असल्याने आम्हांला आता केवळ मताधिक्य वाढीसाठी प्रयत्न करायचे आहेत.जनता धडा शिकवेलआमदार वैभव नाईक म्हणाले,  शिवसेनेच्या काळातील जिल्ह्याचा विकास पहा. मग तुम्हांला फरक समजेल. आम्ही स्वत:च्या धंद्यांच्या वाढीसाठी राजकारण केले नाही. तर शासनाचा आणि जनतेचा फायदा कसा होईल याकडेच लक्ष दिले. त्यामुळे स्वार्थी राजकारण करणाºयांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग