शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 हॉस्पिटल, पंप बांधून कोणाचा विकास केला? : --दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 16:57 IST

जिल्ह्याचा विकास केला, असे सांगणाºया राणेंनी हॉस्पिटल, पेट्रोल पंप, हॉटेल बांधून नक्की कोणाचा विकास केला याचे उत्तर द्यावे, असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. मागच्यावेळी राक्षसाला विधानसभेत रोखले. आता नरकासुराला रोखून दिवाळी साजरी करूया

ठळक मुद्देमहायुतीच्या प्रचार सभेत नारायण राणेंवर जोरदार टीका 

सावंतवाडी : जिल्ह्याचा विकास केला, असे सांगणाºया राणेंनी हॉस्पिटल, पेट्रोल पंप, हॉटेल बांधून नक्की कोणाचा विकास केला याचे उत्तर द्यावे, असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला. मागच्यावेळी राक्षसाला विधानसभेत रोखले. आता नरकासुराला रोखून दिवाळी साजरी करूया आणि जिल्ह्यातील दहशतवादाचा बिमोड करूया, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

माडखोल व आंबोली येथे शिवसेना-भाजप युतीच्यावतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली,  म्हाडाचे संचालक शैलेश परब, राजू राऊळ, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, तालुकाध्यक्ष महेश सारंग, बाळू माळकर, अशोक परब, उद्योजक पुष्कराज कोले, जान्हवी सावंत, विक्रांत सावंत,  रोहिणी गावडे, उत्तम पारधी, मंदार शिरसाट, अशोक दळवी, रुपेश राऊळ, मोहन चव्हाण, रश्मी माळवदे, रामजी रावराणे, सरपंच लीना राऊत, चौकुळ सरपंच रिता गावडे, विजय गावडे, सुषमा गावडे, विजय गावडे, बबन गावडे, रोशनी पारधी, प्रियंका जाधव, रुपेश गावडे आदी उपस्थित होते.                                                                                                           

स्वत:चा विकास करणारे जिल्ह्याचा विकास करू शकणार नाहीत. त्यामुळे अशांना वेळीच बाजूला करा. जिल्ह्यात काही आले तरी मीच आणले असे सांगितले जात होते. मी एका गरीब घरातून इथपर्यंत पोहोचलो. मात्र सोन्याचा चष्मा घेऊन जन्माला  आलेल्यांना सर्वसामान्यांचे जीवन कसे कळणार, असा टोला विनायक राऊत यांनी निलेश राणेंचे नाव न घेता हाणला.यावेळी उद्योजक पुष्कराज कोले व शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात आदींनी राणेंवर टीका केली. 

आम्ही जिल्ह्याचा विकास करताना टक्केवारी मागितली नाही : विनायक राऊत

खासदार राऊत म्हणाले, नॉन मॅट्रिक माणसाने मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण करून एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या व्यक्तीस बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. आम्ही जिल्ह्याचा विकास करताना टक्केवारी मागितली नाही. म्हणूनच निधी पूर्ण खर्च झाला.

माझ्यावर टीका करणारे कितीवेळा संसदेत गेले ते सांगावे, अशी टीका राऊत यांनी केली. खासदार राऊत पुढे म्हणाले, पालकमंत्री आणि खासदार यांच्यावर टीका करण्यापलीकडे कोणतेही काम राणे यांनी केले नाही. 

माझ्यावर टीका टिप्पणी करून मते मिळणार नाहीत हे राणे कंपनीला कळून चुकले आहे. आपण वैयक्तिक टीका करणार नसून गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावरच मतदारांच्या समोर जात आहे, असेही राऊत म्हणाले. 

 

माडखोल येथील सभेत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी टीका केली. यावेळी विनायक राऊत, मायकल डिसोझा, बाळू माळकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग